Mumbai Terorrist Attack: २६\११ हल्ल्याच्या १५ वर्षांनंतरही CSMT वाऱ्यावरच; सुरक्षा धोक्यात

26 11
26 11 sakal
Updated on

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी सीएसएमटी रेल्वेस्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. पंधरा वर्षांत या स्थानकातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसते. या स्थानकावरील बॅग स्कॅनर मशीन आणि डोअर मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल-दुरुस्ती होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी ही यंत्रणा बंद असून रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याबाबत प्रवासी संघटनेचे संताप व्‍यक्त केला आहे.

26 11
Mumbai Attack: 26/11 च्या हल्ल्याशीच नाही तर पुण्याच्या जर्मन बेकरीशीही आहे डेव्हिड उर्फ दाऊदचं कनेक्शन

सीएसएमटी रेल्वेस्थानक हे नेहमीच प्रवाशांनी गजबलेले असते. प्रतिदिन या स्थानकातून १० लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठीही हे महत्त्वाचे टर्मिनल आहे. मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यात या स्थानकाला लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हापासून उपनगरी आणि मेल-एक्स्प्रेसच्या रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला होता.

त्यासाठी या स्थानकात चेक पॉईंट उभारले होते. तिथे अर मेटल डिटेक्टर लावले. तसेच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांकडून हॅण्ड मेटल डिटेक्टरने प्रवाशांची तपासणी केली जात होती. मात्र, आता हॅण्ड मेटल डिटेक्टर दिसत नाहीत, शिवाय येथील डोअर मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल होत नसल्याने अनेक डोअर मेटल डिटेक्टर बंद असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या पश्चिम रेल्वेपेक्षा जास्त डिटेक्टर मध्य रेल्वेवर असून ८५ हून अधिक डिटेक्टर गर्दीच्या आणि संवेदनशील रेल्वेस्थानकांत बसविले आहेत.

26 11
26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या प्रत्यार्पणाच्या हालचाली वाढल्या, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची मोठी माहिती

स्कॅनर मशीन बंदच?

दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असलेल्या सीएसएमटी स्थानकातील बॅग, पार्सल तपासण्यासाठी असलेले अद्ययावत स्कॅनर बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. सीएसएमटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर क्रमांक ४, ५ आणि ६ येथील आरक्षण केंद्र, चौकशी केंद्र आणि तिकीट केंद्राजवळ बॅग स्कॅनर मशीन लावले आहे. मात्र, अनेकदा या मशीन बंद असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यांतर आता सीएसएमटी स्थानकांवरून बॅग स्कॅनर मशीन काढून टाकलेल्या आहेत. त्याच्या जागी नवीन मशीन लावण्यात येणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, सीएसएमटी रेल्वेस्थानकातील सुरक्षा यंत्रणा भक्कम असून बॅग स्कॅनर मशिनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.

26 11
26\11 Attack: कसाबला ओळखणाऱ्या 'देविका'चा सरकारला विसर; अजूनही आश्वासनांची पूर्तता नाहीच

२६/११च्या घटना रेल्वे विसरली आहे. रेल्वेस्थानकांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनामध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पुन्हा असा हल्ला झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात.

- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी प्रवासी महासंघ

---------------------

२६/११’ च्या घटनेला पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर विविध रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढविण्यात आली. चेक पॉईंट उभारण्यात आले होते. डोअर मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर मशीन लावले होते. आता अनेक स्थानकांवर डोअर मेटल डिटेक्टर आणि स्कॅन मशीन बंद अवस्थेत आहेत. फक्त प्रवाशांची सुरक्षा कागदावर राहिली आहे. रेल्वेने तत्काळ मेटल डिटेक्टर आणि स्कॅन मशीन पाहणी करून दुरुस्त करण्यात यावीत.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

26 11
Mumbai Local : रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.