Mumbai News: कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच ओल्या आणि सुक्या कच-याचे होणार वर्गीकरण; पालिकेचा उपक्रम

BMC News : मुंबईत निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण हे उत्पत्ती स्त्रोताच्या ठिकाणीच व्हावे
Mumbai News: कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच ओल्या आणि सुक्या कच-याचे होणार  वर्गीकरण; पालिकेचा उपक्रम
Updated on

मुंबईत ओला - सुका कचरा वर्गीकरण जागच्या जागी करण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. नागरी सहभाग वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे

स्थानिक पातळीवर रहिवासी संस्थांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृती केली जाईल. मुंबईत निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण हे उत्पत्ती स्त्रोताच्या ठिकाणीच व्हावे, अशा सूचना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.

Mumbai News: कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच ओल्या आणि सुक्या कच-याचे होणार  वर्गीकरण; पालिकेचा उपक्रम
Mumbai News : वृद्ध दाम्पत्यांना मिळाले जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबईतील रहिवासी संस्थांच्या माध्यमातून १ हजार टन इतका जमा होणा-या कच-याचे वर्गीकरण करणे, हे घनकचरा व्यवस्थापन विभागासमोरील मोठे आव्हान आहे.

त्यामुळेच कच-याच्या उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच वर्गीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले. या पुढाकाराचा भाग म्हणून माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृतीसाठी संस्थांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवणे यासाठीच थेट संवादाची अधिक गरज आहे. म्हणूनच दैनंदिन कचरा संकलन करण्याच्या प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी हा संवाद घडणे गरजेचे आहे.

Mumbai News: कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच ओल्या आणि सुक्या कच-याचे होणार  वर्गीकरण; पालिकेचा उपक्रम
Mumbai News : एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण; कामगार संघटनेची एसटी महामंडळाला नोटीस!

त्यामुळे ओला कचरा स्वतंत्र्यरित्या संकलित करणे शक्य होईल. मुंबईतील कच-याचे उत्पत्तीस्थान हे घरगुती तसेच रहिवासी संकुलातून देखील आहे. म्हणूनच माहिती, संवाद आणि शिक्षण अभियानातून तसेच लोकसहभागातून हा बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत कच-याच्या उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत माहिती, शिक्षण आणि संवाद आराखडा निश्चित करणे अपेक्षित आहे.

जनजागृतीसाठी भित्तीचित्रांचाही वापर

मुंबईतील नागरिकांमध्ये विविध संदेशांच्या भित्तिचित्रांद्वारे आणि उड्डाणपूल, सार्वजनिक ठिकाणे इत्यादींवर सुशोभीकरणाद्वारे जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. त्यात चित्रे, भित्तिचित्रं इत्यादी प्रकार समाविष्ट असतील. स्वच्छता, कचरा विलगीकरण आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व या माध्यमातून पटवून देण्यात येणार आहे.

Mumbai News: कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच ओल्या आणि सुक्या कच-याचे होणार  वर्गीकरण; पालिकेचा उपक्रम
Mumbai Metro News: डोंगरीत उभे राहणार मेट्रो कारशेड! डेपो, वर्कशॉप, प्रशासकीय इमारती उभाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.