Chembur : पालिका एम पश्चिम विभागांतर्गत असलेल्या झेडा नगर परिसरातील वन विभागा जागेवरील दोनशे पेक्षा अधिक अनधिकृत झोपड्यांवर पालिकेच्या वतीने आज तोडक कारवाई करण्यात आली.
मानखुर्द घाटकोपर जोड मार्गावरील जिमखाना जवळील वनविभागाची कित्येक एकर जागा आहे. या जागेवर अनधिकृत झोपड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कित्येक एकर जागा वनविभाग व काही जागा कॉलेकटरच्या अखत्यारित येत आहे.
त्यामुळे वन विभागाच्या माध्यमातून या जागेवर या भागात ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही या परिसरातील झोपडी दादांनी कित्येक वर्षांपासून या जागेवर अनधिकृतपणे जागा इतरांना विक्री करून करोडो रुपये कमविले आहे.
या जागेवर चारशे पेक्षा अधिक झोपडया उभारल्या गेल्या आहेत. तर काही राजकीय व सामाजिक संस्थेची अनधिकृत कार्यालये देखील आहेत.
या अनधिकृत झोपड्यांवर पालिका एम पश्चिम व वनविभागाने अनेकदा कारवाई केली आहे. मात्र त्यानंतर ही या झोपडया बिनधास्त उभारण्यात आलेल्या आहेत.
आज पालिका व वनविभाग अधिकारी यांनी आपल्या कामगारसह , शिवाजी नगर, टिळक नगर, घटकोपर मधील 150 पेक्षा अधिक पोलीसांचे संरक्षण घेऊन २०० पेक्षा अधिक झोपडयांवर कारवाई केली असून या झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत.
पूर्वी घाटकोपर मानखुर्द जोड मार्गावर मोठे तलाव होते. सद्या तलाव गायब झाले आहे.या मार्गावर पालिकेच्या संगमनताने अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या होत्या आज त्या अधिकृत झाल्या आहेत. या झोपडी मालकांनी या ठिकाणी हॉटेल व लादी, सिमेंट, विटांची दुकाने टाकली आहेत.
या मालकांनी ही तलावाची आजूबाजूची जागा गिळंकृत केली आहे. या मालकांनी बांधकाम करताना पालिकेचे नियम धाब्यावर बसविलेले आहेत. त्या अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या करिता वन विभाग, पोलीस व पालिका अधिकारी जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.