Latest Mumbai News: मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज (ता.१३) विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.