Mumbai Megablock : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

रविवारच्या मेगाब्लॉकमुळे अनेक मेल- एक्सप्रेस गाडयांना बसणार लेटमार्क.
Mega block mumbai on Sunday
Mega block mumbai on SundaySakal
Updated on

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ३० जुलै २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर तर हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर मरिन लाईन्स ते माहिम अप- डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारच्या मेगाब्लॉकमुळे अनेक मेल- एक्सप्रेस गाडयांना लेटमार्क बसणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- ठाणे- कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर कधी- सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहोचतील.

या गाडयांना बसणार फटका -

ठाणे- कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर ब्लॉक घेतल्यामुळे पुणे-सीएसएमटी सिंहगढ़ एक्सप्रेस, नांदेड़-सीएसएमटी राज्यरानी एक्सप्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, मंगलुरु-सीएसएमटी एक्सप्रेस, पटना-एलटीटी एक्सप्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्सप्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस, चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस, बनारस-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस, हावड़ा-सीएसएमटी मेल, हटिया-एलटीटी एक्सप्रेस, सीएसएमटी-कोल्हापुर एक्सप्रेस, एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस, एलटीटी-जयनगर एक्सप्रेस आणि एलटीटी-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस १० ते १५ लेटमार्क बसणार आहे.

मेमू सेवा शॉर्टमिनेट

मेमू क्रमांक ०१३३९वसई रोड - दिवा वसई रोडवरून सकाळी ०९.५० वाजता कोपरपर्यंत धावणार आहे. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान ही मेमू सेवा रद्द राहील. मेमू क्रमांक ०१३४० कोपरपासून सकाळी ११.४५ वाजता सुटेल आणि दिवा आणि कोपर स्थानकावर दरम्यान ही मेमू सेवा रद्द होईल.

हार्बर रेल्वे -

कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर

कधी - सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे -

कुठे - मरिन लाइन्स ते माहीत अप- डाऊन धीम्या मार्गावर

कधी -सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा मरीन लाईन्स ते माहीम स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या लोकल सेवा महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबणार नाहीत. लोअर परळ आणि माहीम जंक्शन येथे डाऊन दिशेच्या सर्व धीम्या सेवा दुहेरी थांबा देण्यात येणार आहे, तसेच या ब्लॉककालावधीत काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.