Mumbai : छळ करणाऱ्या पतीस दीड वर्षाचा कारावास

सासू, सासरे, नणंद यांची निर्दोष मुक्तता
Mumbai
Mumbai esakal
Updated on

नवी मुंबई - मुलगा होत नाही म्हणून छळ करणाऱ्या आणि वेगवेगळ्या कारणाने पत्नीकडून तब्बल १ कोटी ३६ लाख रुपये उकळून स्त्री धनाचा अपहार करणाऱ्या पतीला नवी मुंबई न्यायालयातील न्या. विकास बडे यांनी एक वर्षे सहा महिन्यांची कारावास सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावली आहे. या खटल्यातून विवाहितेचे सासू, सासरे व नणंद या तिघांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

Mumbai
Pune : महापालिकेच्या डंपरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

हा प्रकार वाशी सेक्टर-१४ मध्ये २०११ ते २०१८ या कालावधीत घडला होता.चिराग हर्षद सूचक (३८) हा पत्नी रेणुका, आई जयश्री, वडील हर्षद आणि बहीण प्रीती हेमंत ठक्कर यांच्यासोबत वाशी सेक्टर १४ मध्ये राहण्यास आहे. २०११ मध्ये चिरागचे रेणुकासोबत लग्न झाले होते. काही दिवसांनंतर तिचा शारीरीक व मानसिक छळ सासरचे मंडळी करू लागले. अखेर या छळाला कंटाळून तिने २०१८ मध्ये वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी रेणुकाचा पती, सासू, सासरे व नणंद या चौघांविरोधात छळवणुकीसह मारहाण करणे, स्त्रीधनाचा अपहार आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा सहायक पोलिस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी तपास करून साक्षी पुराव्यासह आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

Mumbai
Mumbai News : लग्नसराई, त्यात उन्हाळी सुट्टी! मेगाब्लॉकमुळे मुंबईकर बेहाल

खटल्याच्या सुनावणीत न्या. विकास बडे यांनी चिरागला दोषी ठरवून एक वर्षे सहा महिन्यांच्या कारावासाची; तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने या खटल्यातून विवाहितेचे सासू, सासरे व नणंद या तिघांची निर्दोष सुटका केली आहे. सरकारी पक्षातर्फे अरुण फाटके यांनी काम पाहिले.

Mumbai
Mumbai News : डांबराच्या रस्त्यावर चक्क शेती...! संतप्त शेतकऱ्याने केली भाजीपाल्याची लागवड

मुलासाठी तगादा

काही दिवसांनंतर रेणुकाच्या सासरकडील मंडळींनी रेणुकाच्या आई-वडिलांनी लग्नात केलेले २४ लाख ५७ हजार रुपये किमतीचे (स्त्री-धन) सोने-चांदी व हिऱ्यांचे दागिने काढून घेतले होते. त्यानंतरही वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये घेतले. या दरम्यान रेणुकाला मुलगी झाल्यानंतर दुसरे अपत्य ठेवल्यास जीवाला धोका होता. तरीही सासू, सासरे व नणंद या तिघांनी तिला मुलासाठी तगादा लावून शारीरीक व मानसिक छळ सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.