मुंबईतील विसर्जन सोहळा यंदा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी मुंबई पोलिस तसेच मुंबई महानगरपालिका सजग आहेत. शहरभरात सर्व विसर्जन स्थळांवर विशेष सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची कंबर कसण्यात आली आहे. धोकादायक पुलांवरून मिरवणूक जात असताना १०० पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी नसाव्यात यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत.