Mumbai : एससीएलआर विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टळणार; स्टेड केबल पूल उभारणीला वेग

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) ते पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH)मार्गे अंधेरीकडे जाणाऱ्या वाहन चालकांना सिग्नल फ्री अखंड प्रवासाचा आनंद घेता येईल. कारण पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाणार्‍या सांताक्रूझ चेंबूर लिंक रस्त्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

Mumbai
Mumbai : शहरात पोलिसांकडून ऑपरेशन 'ऑल आऊट' कार्यान्वित; 5 हजार वाहनचालकांवर कारवाई

पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्टेड केबल्सद्वारे ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकसह भारतातील पहिल्या तीक्ष्ण वक्र असणाऱ्या स्पॅनच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पातील फेज १च्या केबल स्टे स्पॅनसाठी सेगमेंट्स फॅब्रिकेशनला सुरुवात केली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पाचा एक भाग असलेल्या केबल स्टेड पुलाची उभारणी करते आहे. २१५ मिटरच्या केबल स्टेड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या पुलाचा स्पॅन अधिक वक्राकार आहे. पुलाच्या बांधणीत वापरेलेल्या ऑर्थोट्रॉपिक स्टिलच्या डेकला स्टे केबलने आधार दिलेला आहे.

तीरप्या केबलने अर्थात धातूच्या दोरखंडामूळे संपुर्ण भार किंवा त्या भागाचे वजन हे थेट पुलाच्या खालच्या खांबावर न येता ते पायलॉनवर म्हणजेच पुलाच्या आडव्या विस्तारावर विभागले जाते. या पुलाची रुंदी १०.५ मीटर आहे. यात ७.५ मीटर रुंदीचा कॅरेज वे (२ मार्गिका) आहे.

Mumbai
Congress : ''पंढरपुरात सरकारने पांडुरंगाचा अपमान केला'', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमोरच पटोलेंनी...

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR)चे विस्तारीकरण मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (MUIP) या अंतर्गत पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी हा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे. जेणेकरुन बीकेसीमधील प्रमुख व्यावसायिक केंद्रामध्ये रहदारीस आवश्यक असणाऱ्या प्रवासाला गती मिळेल. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तारीकरण प्रकल्पामुळे बीकेसीला पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गला एलिव्हेटेड कॉरिडॉरद्वारे जोडण्यात येईल.

या कॉरिडॉरमध्ये चार जंक्शन समाविष्ट आहेत. यात बीकेसी जंक्शन, विद्यापीठ जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक; वाकोला जंक्शन आणि एमटीएनएल जंक्शन जे बीकेसी ते लाल बहादूर शास्त्री मार्गाला जोडणाऱ्या या प्रकल्पाचा भाग आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ८८%हुन अधिक भौतिक कामे झाली आहेत तर प्रकल्पाचे ९०%हुन अधिक काम पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.