Mumbai Traffic: मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, 'या' उड्डाणपुलाची मार्गिका होणार सुरू

Malad Latest news: ११ एप्रिल २०२२ रोजी या कामाचे भूमिपूजन करण्‍यात आले.
Mumbai Traffic Malad Jod Marg inaugurated by Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
Mumbai Traffic Malad Jod Marg inaugurated by Union Commerce and Industry Minister Piyush Goyal sakal
Updated on

Latest Mumbai News: मालाड (पश्चिम) येथील मीठ चौकी, जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका आणि नवीन बांधलेल्‍या मालवणी टाऊनशिप महापालिका शालेय इमारतीचे लोकार्पण रविवार (ता. ६) दुपारी १२ वाजता केंद्रीय वाणिज्‍य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्‍या हस्ते होणार आहे.

मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मीठ चौकी जंक्‍शनवर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्‍हणून पालिकेने ‘टी’ आकाराचा उड्डाणपूल बांधण्‍याचा निर्णय घेतला. ११ एप्रिल २०२२ रोजी या कामाचे भूमिपूजन करण्‍यात आले.

Mumbai Traffic Malad Jod Marg inaugurated by Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
Mumbai Traffic Updates: मुंबईतील अनेक रस्ते 23 सप्टेंबर रोजी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्गांविषयी सर्वकाही

मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी मार्गिका आणि मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी मार्गिका, अशी या उड्डाणपुलाची रचना आहे. त्‍यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका वाहतुकीसाठी रविवारी खुली करण्‍यात येणार आहे. या मार्गिकेची लांबी ३९० मीटर असून रूंदी ८ मीटर आहे. दहिसर ते अंधेरी (पश्चिम) मेट्रो - २च्‍या उन्‍नत मार्गामुळे पालिकेने बांधलेल्‍या उड्डाणपुलाच्‍या उंचीवर मर्यादा आल्‍या आहेत. परिणामी हलक्‍या वाहनांसाठीच या उड्डाणपुलाच्‍या मार्गिकेचा वापर केला जाणार आहे.

तर मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी उड्डाणपुलाची मार्गिका डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत खुली करण्‍याचे नियोजन आहे. त्‍यादृष्‍टीने, दुसऱ्या मार्गिकेचे काम अत्‍यंत वेगाने पूर्णत्‍वाकडे नेण्‍यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्‍पासाठी एकूण ५५ कोटींचा खर्च अंदाजित आहे. दरम्यान या उड्डाणपुलाची एक मार्गिका (मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्ग) खुली केल्‍यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल; परिणामी, वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

Mumbai Traffic Malad Jod Marg inaugurated by Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
Mumbai-Goa Highway Traffic Video: "प्रत्येक गणेशोत्सवात तेच..." मुंबई-गोवा मार्गावर चार तासांपासून वाहतूक कोंडी, प्रवासी संतापले

मालवणी टाऊनशिप शालेय इमारतीचे लोकार्पण

मालाड (पश्चिम) परिसरात मालवणी - मार्वे मार्गस्थित मालवणी टाऊनशिप महापालिका शालेय इमारतीचे लोकार्पण रविवारी (ता. ६) होणार आहे. मालवणी टाऊनशिप पालिका शाळेची स्थापना सन १९६६ मध्ये झाली. पूर्वी या इमारतीचे स्वरूप तळमजला अधिक एक मजला असे होते. ही शालेय इमारत सन २०२० मध्ये निष्कासित करण्यात आली. त्यानंतर तळमजला आणि सहा मजले अशा स्वरूपात या शालेय इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

Mumbai Traffic Malad Jod Marg inaugurated by Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
Mumbai Traffic : मुंबई-ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; ‘MMRDA’ची कंत्राटदार नियुक्तीस मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.