Mumbai Traffic News : डोंबिवली पश्चिमेत वाहन कोंडी होणार नाही ; 'डि' कंजेक्शन प्लॅन तयार !

Mumbai Traffic News
Mumbai Traffic Newssakal
Updated on

Mumbai Traffic News : डोंबिवली थेट ठाणे शी जोडणारा माणकोली उड्डाणपूलाचे काम अखेरच्या टप्प्यात सुरु आहे. हा पूल वाहतूकीसाठी खुला झाल्यानंतर डोंबिवलीतील मोठागांव येथे वाहन कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. मोठागाव येथे होणारी वाहन कोंडी फोडण्यासाठी डी कंजेक्शनचा प्लॅन तयार करण्यात आला आहे.

माणकोली पूलावरुन येणारी वाहने ही डी कंजेक्शन प्लॅन नुसार 18 मीटरचा पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल रेल्वे फाटकाजवळील रेल्वे उड्डाणपूलाला जोडण्यात येणार असून यामुळे मोठागाव परिसरातील अरुंद रस्त्यावर होणारी वाहन कोंडी होणार नाही असे सांगण्यात आले आहे.

Mumbai Traffic News
Mumbai News : भाजप-ठाकरे गट मुंबईत आमने-सामने; देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर दोन्ही पक्षांत ‘सामना’

ठाणे ते डोंबिवली हा अंतर कमी करणारा माणकोली उड्डाणपूल बांधून तयार आहे. या पूलाच्या पोहोच रस्त्याचे काम सध्याच्या घडीला सुरु आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे बोलले जात असल्याने डोंबिवली शहरात वाहन कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठा गाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपूलाचे काम अद्याप बाकी आहे.

Mumbai Traffic News
Kalyan News : कल्याण मध्ये आढळले मृत अर्भक; परिसरात उडाली खळबळ

तसेच माणकोली उड्डाणपूल ते रेल्वे फाटक हा रस्ता अरुंद असल्याने या परिसरात वाहन कोंडी होण्याची मोठी शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी डि कंजेक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. कोपर परिसरातून हा पूल तयार करण्यात येत असून यामुळे मोठागाव येथील कोंडी फुटणार आहे.

Mumbai Traffic News
Mumbai Crime : रिक्षा भाडे कमी घेतले म्हणून रिक्षाचालकाला मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

याविषयी माहिती देताना माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे म्हणाले, एमएमआरडीए अधिकारी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी याचे नियोजन आधीच केले आहे. रेल्वे फाटका वरील उड्डाणपूलाचे काम दिवाळीनंतर सुरु होईल. माणकोली खाडी पूलाजवळून कल्याण दिशेला जाण्यासाठी रिंगरुट उभारण्यात येणार आहे. मोठागाव ठाकुर्ली ते कल्याण दुर्गाडी हा रिंगरोड प्रकल्पाचा तिसरा टप्पा असून या कामाची निविदा एमएमआरडीने प्रसिद्ध केली आहे.

Mumbai Traffic News
Mumbai Crime : मेकअप करायला आल्या नी नवरीचे दागिने चोरुन पळाल्या

तसेच मोठागाव परिसरात वाहन कोंडी होऊ नये म्हणून डि कंजेक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. कोपर परिसरातून हा रस्ता जात असून तो रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपूलाला जोडण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल आनंद नगर, एच वॉर्ड येथे उतरणार आहे. यामुळे डोंबिवली पश्चिमेतील कोंडी होणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात कल्याण ते ठाणे हा जलवाहतूकीचा मार्ग सुरु होणार आहे. त्यासाठी ही उपाययोजना आधीच करण्यात आली आहे याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.