Mumbai Traffic: अवघ्या ४० मिनिटांत ठाणे-मुंबईचा प्रवास! वाचा 'MMRDA' चा नवा प्लॅन

Mumbai Thane Highway: मुंबई-ठाणे हा प्रवास लोकलसारखा सुसाट होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai Traffic: अवघ्या ४० मिनिटांत ठाणे-मुंबईचा प्रवास!  वाचा 'MMRDA' चा नवा प्लॅन
Updated on

Latest Marathi News: ठाणे-मुंबईचा प्रवास सुसाट व्हावा, या उद्देशाने एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्व मुक्त मार्गचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुक्त मार्गाचा घाटकोपर छेडानगर ते ठाणे असा विस्तार करण्यात येणार आहे.

तसेच हा मार्ग उन्नत असणार असून, मुंबई ते ठाणे अंतर ४० मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई-ठाणे हा प्रवास लोकलसारखा सुसाट होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Traffic: अवघ्या ४० मिनिटांत ठाणे-मुंबईचा प्रवास!  वाचा 'MMRDA' चा नवा प्लॅन
Mumbai BJP: मुंबई भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, त्या बॅनरची होत आहे जोरदार चर्चा!

या मार्गाच्या एकूण सहा मार्गिका असून, तो उन्नत असणार आहे. तसेच मार्ग विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे-मुंबईतील अंतर कमी होणार आहे. दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईदरम्यान वाहनांची ये-जा सुरळीत होणार आहे. वाहतूक कोंडीच्या दृष्टीने विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रॅम्प आणि अत्याधुनिक टोल प्लाझामुळे हा प्रकल्प अधिक कार्यक्षम होईल. मुंबई आणि ठाणे शहरात रिंगरुटचे जाळे निर्माण करण्यास या फ्रीवे मार्गाचा हा विस्तार उपयोगी ठरणार आहे. उन्नत रचनेसह या मार्गामुळे रस्त्यांवरील ताण कमी होणार आहे. हा विस्तार मार्गाशी महत्त्वांचे मार्ग जोडले जातील. जेणेकरून एका मार्गावरून दुसरीकडे जाणे अधिक सुलभ होईल.

दरम्यान, १६.८ किमी लांबीचा ईस्टर्न फ्रीवे सीएसएमटीजवळ सुरू होतो. मानखुर्दजवळ तो संपतो. एमएमआरडीएने २०१४ मध्येच एलिव्हेटेड रोडची तयारी केली होती. येथून वाहने २० मिनिटांत मानखुर्द किंवा घाटकोपरजवळ तसेच दक्षिण मुंबईला पोहोचतात. छेडानगर ते ठाण्यापर्यंतच्या फ्रीवेचे विस्तारीकरण झाल्यानंतर वाहने सुमारे २० मिनिटांत ठाण्यात पोहोचू शकणार आहेत. ४० मिनिटांत मुंबई ते ठाणे हा प्रवास पूर्ण होणार आहे.

Mumbai Traffic: अवघ्या ४० मिनिटांत ठाणे-मुंबईचा प्रवास!  वाचा 'MMRDA' चा नवा प्लॅन
Mumbai BJP: मुंबई भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, त्या बॅनरची होत आहे जोरदार चर्चा!

प्रकल्पाचे फायदे

अखंडित जोडणी : या विस्तारामुळे दक्षिण मुंबई ठाण्याशी जोडली जाणार आहे. नवी मुंबई, पूर्व उपनगरे आणि त्या पलिकडील भागाशी थेट पोहोचमार्ग उपलब्ध होतो. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील अवलंबित्व कमी होते.

प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत : जलद, थेट रस्ता उपलब्ध करून दिल्याने मुक्त मार्ग विस्तारामुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेची परिणामी मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. त्यामुळे पर्यावरणाला त्याचा फायदा होणार आहे.

एकात्मिकृत (इंटिग्रेटेड) बाह्य रिंग रोड : या प्रकल्पामुळे मुंबईच्या बाह्य रिंग रोडचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होईल. या टप्प्यात नरिमन पॉइंट, वांद्रे-वरळी सागरी सेतू, वर्सोवा आणि दहिसर यांसारखी प्रमुख ठिकाणे जोडली जातील. यामुळे संपूर्ण भागातील प्रवास अधिक सुरळीत होईल.

Mumbai Traffic: अवघ्या ४० मिनिटांत ठाणे-मुंबईचा प्रवास!  वाचा 'MMRDA' चा नवा प्लॅन
Mumbai Crime: दोन हजार रुपये परत केले नाही म्हणून केला मित्राचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.