Mumbai: राज्‍यभरात लवकरच दोन हजार ग्रंथालये; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

त्यात दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
deepak kesarkar
deepak kesarkar sakal
Updated on

मुंबई - ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये दोन हजार ग्रंथालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

deepak kesarkar
Sambhaji Nagar : तालुकाध्यक्ष पदासाठी अनेकांकडून ‘जोर’; आमदार बागडेंचा शब्द ठरणार अंतिम

तसेच, राज्यातील दहा लाख विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण विभागामार्फत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. आवश्‍यकतेनुसार त्यातील एक लाख विद्यार्थ्यांना ‘वनसाईट इझीलर लक्झोटिका फाऊंडेशन’ आणि ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून चष्मेवाटप करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

deepak kesarkar
Nagar: अमरापूरच्या रेणुकामाता मंदिरातील दागिने लंपास; सीसीटीव्ही फुटेजमध्ये...

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत रामटेक या शासकीय निवासस्थानी गुरुवारी याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी वनसाईट फाऊंडेशनच्या स्वतंत्र संचालक स्वाती पिरामल, फाऊंडेशनचे प्रमुख अनुराग हंस, संचालक मंडळाचे सदस्य के. व्ही. महेश, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे राजीव मेहता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजितसिंह देओल, सहसचिव इम्तियाझ काझी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामंजस्‍य करार

रत्ननिधी ट्रस्टच्या माध्यमातून तरूणांना सक्षम करण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता प्रदान करून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि रत्ननिधी ट्रस्टमध्ये द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला असून या माध्यमातून संस्थेमार्फत दर्जेदार कथा पुस्तके, चित्र पुस्तके, बालवाडी पुस्तके, कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ शाळांसाठी शैक्षणिक संदर्भ पुस्तके तसेच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()