बीकॉम तृतीय वर्षाच्या सत्र ५ चा निकाल जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

Mumbai University
Mumbai UniversitySakal media
Updated on

मुंबई : कोरेाना काळामुळे (corona pandemic) ऑनलाईन परीक्षा (online exam) घेऊन त्याचे निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) आघाडी घेतली असून त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या (winter session) पारंपारिक वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ (bcom third year semester fifth) या परीक्षेचा निकाल (Result announced) आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या परीक्षेचा निकाल ९४.०० टक्के लागला असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

Mumbai University
पालघर : महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

या परीक्षेत एकूण ६४ हजार ८५० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६९ हजार ३७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६८ हजार ९९१ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ३८८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४१४१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ११९ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉम समवेत बीएस्सी सत्र ६ ( ७५:२५) व बीएड (स्पेशल एज्युकेशन) एएसडी सत्र २ असे एकूण तीन निकाल जाहीर केले आहेत.

निकाल आणि उत्तीर्ण विद्यार्थी

नोंदणी केलेले विद्यार्थी : 69,379

परीक्षेला बसलेले : 68,991

गैरहजर राहिलेले विद्यार्थी : 388

उत्तीर्ण विद्यार्थी : 64,850

अनुत्तीर्ण विद्यार्थी : 4141

निकालाची टक्केवारी : 94.00 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.