मुंबई : मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुन्हा सरकार स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात विधान भवनात शुक्रवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक असल्याचे सामंत यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा... लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा..
कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेणे शक्य होईल, असेही सामंत म्हणाले.
महत्वाची बातमी त्यांनी दिवसाढवळ्या केलं 'हे' काम; मग काय 'ते' संतापले
संत विद्यापीठ निर्मितीसाठी समिती स्थापन
महाराष्ट्राला महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. राज्यात पैठण येथे संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून, त्यासाठी समिती स्थापन करण्याचेही आदेश सामंत यांनी यावेळी दिले. या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असावा, असेही सामंत यांनी सांगितले. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने उपस्थित होते.
Mumbai University to be split!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.