... आणि राजाबाई टॉवरला मिळाली नवी झळाळी; वाचा सविस्तर

mumbai rajabai tower
mumbai rajabai towersakal media
Updated on

मुंबई : शिक्षणासोबतच (education) जागतिक वारसा यादीत आपली एक स्वतंत्र ओळख आणि वेगळा ठसा उमटवलेल्या मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) राजाबाई टॉवरला (rajabai tower) पाच वर्षानंतर पुन्हा नवी झळाळी मिळाली आहे. यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) मोलाचे सहकार्य मिळाले आहे, तर वारसा यादीतील इमारतींची देखभाल आणि दुसरूस्ती करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आर्किटेक्ट सोमय्या अ‍ॅण्ड कलप्पा (somaya and kalappa company) या कंपनीने सर्व प्रकारच्या शास्त्रशुध्द पद्धतीचा वापर करून राजाबाई टॉवरला नवी झळाळी मिळवून दिली आहे. यासाठीचे दुसऱ्या टप्प्यातील कामकाज नुकतेच पूर्ण झाले असून पुन्हा एकदा मुंबईची शान असलेले हे टॉवर मुंबईकर आणि देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

राजाबाई टॉवरच्या पहिल्या जिर्णोद्वाराचे काम मे २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते. त्यावेळीही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने तब्बल ४ कोटीहून अधिक रूपयांच्या निधीची मदत केली होती. यावेळीची याच मदतीने दुसऱ्या टप्प्याचे कामकाम पूर्ण झालेअसल्याने राजाबाई टॉवरला झळाळी मिळाल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.

mumbai rajabai tower
मुंबई उपनगरचे पालकमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टला भाजपसह 'या' पक्षाचा विरोध

राजाबाई टॉवर हे एकुण २८० फूट उंच असून संपूर्ण रचना ही गॉथिक शैलीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मूळ रचनेला कुठेही बाधा येणार नाही, यासाठी खास काळजी घेण्यात आली असून त्यासाठी वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचा मिलाफासह बांधकाम करण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. तसेच गॉथिक शैली जतन करण्यासाठी ज्या ठिकाणी नक्षी दुभंगली होती तीही हुबेहूब तयार करण्यात आल्या, टाईल्सही तशाच वापरण्यात आल्‍या.

टॉवरमध्ये असलेल्या फर्निचरला त्यवेळी असलेले रंग हुबेहूब तसेच देण्यात आले, अनेक ठिकाणी असलेल्या लाकडी फर्निचरलाला झळाळी देण्यात आली.यावेळी राजाबाई टॉवरच्या कामात प्रामुख्याने बाहेरील रंग रंगोटी, देखभाल यासोबत येथे असलेल्या ऐतिहासिक ग्रंथालयाचे त्यासोबतच फर्निचरचेही कामकाम मोठया प्रमाणात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या ग्रंथालयात अत्यंत जुनी पुस्तके, दस्तावेज, सोबतच तब्बल चौदाव्या शतकापासूनचे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रकृती आहेत.

राजाबाई हे प्रेमचंद रॉयचंद यांच्या आईचे नाव

राजाबाई टॉवर हे इंग्रजी राजवटीत उभारले असले तरी त्यामागे मुंबईतील ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांची खूप महत्वाची भूमिका होती. प्रेमचंद रॉयचंद यांनी मुंबईत सर्वात उंच क्लॉक टॉवर उभारला जावा आणि त्याला आपल्या आईचे नाव दिले जावे, अशी इच्छा व्यक्त केली हेाती. राजाबाई या अंध होत्या, त्यामुळे त्यांना या टॉवरवर उभारण्यात येणारऱ्या घड्याळाचा आवाज ऐकू यावा अशी त्याची इच्छा होती. त्या अटीवर हा टॉवर बांधण्यासाठी १८६९ मध्ये तीन लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या आईचे नाव राजाबाई म्हणून या टॉवरला राजाबाई क्लॉक टॉवर असे नाव दिले गेले हेाते.

mumbai rajabai tower
गणेश मूर्तिकार सावरतायत ;पुराचा फटका बसूनही जोमात काम

असे घडले राजाबाई टॉवर..

ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांनी दिलेल्या देणगीनंतर मुंबईत तेव्हाच्या समुद्र किनारपटटी शेजारी १ मार्च, इ.स. १८६९ रोजी या वास्तूची पायाभरणी झाली. हे टॉवर आणि बाजूला असलेले दिक्षांत सभागृह या दोन्हीसाठी तब्बल दहा वर्षाचा कालावधी लागला. नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये या टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले. जगविख्यात आर्किटेक्ट सर जॉर्ज गिलबर्ट स्कॉट यांच्या कल्पनेतून आणि खास गॉथिक शैलीत हे राजाबाई टॉवर साकारले. त्याची या टॉवरच्या पायात नोंद ही C.T.S BM, AD 1877 असे दोन ठिकाणी पाषाण दगडावर कोरण्यात आली आहे. हीच खूण विद्यापीठाच्या या टॉवरच्या उभारणीची महत्वाची खूण असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

१९९६ साली झाले बाँबेचे मुंबई विद्यापीठ

'वुड्स शैक्षणिक योजने' अंतर्गत मुंबई विद्यापीठाची स्थापना सन १८५७ मध्ये झाली होती. जगभरात अजूनही या विद्यापीठाची ओळख हे पूर्वी नाव असलेले 'बाँम्बे विद्यापीठ म्हणूनच होत असते. या विद्यापीठाचे मराठी नामगरण हे ४ सप्टेंबर १९९६ रोजी तत्कालिन राज्य सरकारने अधिसूचना काढून केले आणि तेव्हापासून या विद्यापीठाला मुंबई विद्यापीठ नावाने ओळखले जाऊ लागले.

"राजाबाई टॉवर हे खूप जुनी आणि ऐतिहासिक इमारत आहे. या इमारतीच्या जिर्णोद्वाराचे कामकाम आम्ही दोन टप्प्यात केले. सुरूवातीला २०१३ ते २०१६ या कालावधी पहिल्या टप्यात इमारतीचे स्ट्रक्टरख्‍ सिलिंग, वॉल, येथे असलेले नक्षीकाम यावर खूप परिश्रम घेऊन ते हुबेहूबपणे पुन्हा उभे केले. खूप मोठ्या प्रमाणात नक्षीकामाला तडे गेले हेाते, त्यात आम्ही खूप चांगले काम केले. आता दुसऱ्या टप्प्यात २०१८ ते २०२१ या काळाल राजाबाई टॉवरच्या आतील लायटींग, आणि जुन्या फर्निचरसोबत बाहेरील कामकाज पूर्ण केले. यामुळेच आम्हाला युनोस्कोसारखे पुरस्कारही मिळाले. या टॉवरचे कामकाज करताना आमचा अनुभव खूपच प्रेरणादायी राहिला."

-ब्रिंदा सोमय्या, आर्किटेक्ट, सोमय्या अ‍ॅण्ड कलप्पा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()