मुंबई - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी आपल्या वापरसाठी खरेदी केलेल्या लाखो रूपयांच्या महागड्या गाड्यांची चौकशी होणार आहे. यासाठी उच्च शिक्षण सहसंचालिका डॉ. वैशाली रोडे यांनी गाड्या खरेदीत विद्यार्थ्यांच्या पैशाचा गैरवापर झाला असले तर त्यांची चौकशी केली जाईल अशी माहिती आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट या सर्वसाधारण सभेत दिली. तसेच या चौकशीचा अहवाल हा पुढील सिनेटमध्ये जाहीर केला जाईल असेही जाहीर केले.
कुलगुरू पेडणेकर यांनी मागील एक वर्षांपूर्वी फॉर्च्युनर आणि प्र-कुलगुरूंसाठी इंनोवा क्रिस्टा यासारख्या 60 लाखांहून अधिक किंमतीच्या महागडया गाड्या शासनाचे आणि विद्यापीठाचेही नियम धाब्यावर बसवून खरेदी केल्या, त्यावर आज युवा सेनेच्या प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, शितल शेठ-देवरूखकर आदींनी स्थगन प्रस्ताव उपस्थित करून कुलगुरूंना भंडावून सोडले हेाते. तर यावर कुलगुरूंनी या गाड्या खरेदीसाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच त्या घेण्यात आलेल्या असल्याचा खुलासा केला. शिवाय यावर आपण मागील अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला होता, त्याला उत्तर दिल्याने नियमानुसार मी यावेळी या विषयावरील स्थगन प्रस्ताव नाकारत असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे युवासेनेच्या सदस्यांनी यावर आम्हाला उत्तर यापूर्वीही मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही समाधानी नसल्याने उत्तर हवे म्हणून सिनेटचे कामकाजच रोखून धरले होते. शासनाच्या जीआरचा हवाला आणि नव्याने आपल्याला माहिती मिळाल्याने आम्ही हा प्रश्न उपस्थित करत असल्याचे सांगत प्रदीप सावंत यांनी यावर उत्तर हवे म्हणून कुलगुरूंना जाब विचारला तर यावर काही वेळ सदस्य आणि कुलगुरूंमध्ये एकमेकांवर राजकारण होत असल्याचा आरोपही झालाकुलगुरूंनी शेवटी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला.
कुलगुरूंना करावी लागली सारवासारव
शासनाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. रोडे यांनी सिनेटमध्ये कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंच्या महागड्या गाड्या खरेदी करताना विद्यार्थ्यांच्या पैशाचा गैरवापर झाल्यास त्याची चौकशी केली जाईल असे जाहीर करताच, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांची भंबेरी उडाली. त्यांनी थेट डॉ. रोडे यांनी जाहीर केलेल्या चौकशीचे उत्तर हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे म्हटले. त्यावर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यास त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच व्यवस्थापन परिषदेत याविषयी निर्णय झाला होता. आणि आपण प्रत्येक कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.