मुंबईकरांनो, लसीकरणाला जाण्यापूर्वी 'ही' बातमी नक्की वाचा

लसीकरण केंद्रावरील गोंधळ थांबवण्यासाठी पालिकेचा उपाय
Corona vaccinations
Corona vaccinationsEsakal
Updated on

मुंबई : लसीकरण नियोजन फसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक ठिकाणी धक्काबुक्की आणि मारामारीची प्रकरणंदेखील समोर आली. त्यामुळेच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ज्या नागरिकांनी 'कोविन ॲप' (covin app) वरुन नोंदणी केली असेल, किंवा ज्यांनी संबंधित लसीकरण केंद्रावर जाऊन 'अपॉइंटमेंट स्लॉट' (appointment slot) घेतला असेल. अशाच लाभार्थ्यांचं लसीकरण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. (mumbai vaccination according to covin app registration and appointment slot in mumbai)

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination ) हे दि. 16 जानेवारी 2021 पासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे 147 लसीकरण केंद्रे ही लशींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत. मात्र गेले काही दिवस पालिका क्षेत्रातील विविध लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सामाजिक दूरीकरणासारख्या कोविड (covid) प्रतिबंधात्मक बाबींची अंमलबजावणी योग्यरित्या होणे कठीण झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागत आहे.

Corona vaccinations
बापाला पाणी पाजण्यासाठी धडपड, डोळ्यादेखत वडिलांचा झाला मृत्यू

यावर उपाय म्हणून पालिकेने, आता केवळ 'कोविन ॲप' किंवा 'कोविन पोर्टल' यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर 'अपॉइंटमेंट स्लॉट' मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत.

45 वर्षावरील नागरिक अपवाद

वय वर्षे 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे 'हार्ड कॉपी' किंवा 'सॉफ्ट कॉपी' स्वरूपात सादर केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल असे पालिकेने कळवले आहे.

आरोग्य कर्मचारी किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांच्याबाबत ज्यांना कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे अशा व्यक्ती. तसेच आरोग्य कर्मचारी किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांच्याबाबत लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा असल्यास अशा व्यक्तींच्या बाबत त्यांच्या नियोक्त्याने अधिकृतपणे प्रमाणित केलेले निर्धारित नमुन्यातील पत्र याची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

संपादन : शर्वरी जोशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()