मुंबई : लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

दिवाळीच्या प्रारंभाला मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : कोविडच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिवाळीच्या पर्वाला प्रारंभ करताना लस घेणे आणि मास्क लावणे अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले. नव्या जगात वावरताना कोविडबरोबरच निपा, झिका आदी कित्येक जिवाणू-विषाणू आव्हाने समोर येणार आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी आवश्यक होणार आहे, असे ते म्हणाले.

‘कुछ लेते क्यूं नही’ ही झाली जाहिरात; पण आता सर्दी झाली तरी चाचणी करणे आवश्यक आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. दिवाळी स्नेहमीलनानिमित्त आज त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील अर्थव्यवस्थेवर कोविडचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे लसीकरणाची मोहीम राबवत आहेत. पूर्वी लशी नव्हत्या.

Mumbai
जेएनपीटीची मोफत कोविड १९ लसीकरण मोहीम

आता मात्र त्या मुबलक प्रमाणात आहेत. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जाऊन सुविधेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. मुंबई शहरातील जवळपास शंभर टक्के पात्र नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. पाश्चात्य देशांना पुन्हा एकदा कोविडने पछाडले असल्याने आता काळजी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.