अनाथ आश्रमातून एक अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता होती...
मुंबई: वसई पश्चिमेकडील 'लिबीयाना निकेतन अनाथ आश्रमातील हरवलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीला काही तासांमध्येच वसई पोलिसांनी शोधून काढले. एका हॉटेल व्यवसायिकाच्या मदतीने बेपत्ता झालेली मुलगी पोलिसांना सापडली. अविनाश कुसे असे या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोलिसांना अगदी योगायोगाने त्या मुलीची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी आपले कौशल्य वापरून त्या मुलीचा शोध लावला. (Mumbai Vasai Hotelier helps Police to trace missing girl within hours)
नक्की काय घडलं?
वसईतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुनिल भागीरथ यांनी कुसे यांच्या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास चहा पिण्यासाठी फेरफटका मारला. त्यावेळी भागीरथ काहीसे चिंतेत असल्याचे दिसले. कुसे यांनी भागीरथना चिंतेचे कारण विचारले आणि त्यांच्याकडून कुसेला बेपत्ता मुलीबद्दल माहिती मिळाली. तातडीने कुसे याने गतिमंद मुलीचे फोटो सोशल मीडियावर पाठवले. अवघ्या 15 मिनिटांमध्ये कुसेला मित्राचा फोन आला. या अल्पवयीन मुलीला रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात आपण पाहिलं असल्याचं कुसेच्या मित्राने सांगितले. त्यानंतर पोलिसांना कुसे आणि त्याच्या मित्राच्या सहकार्याने त्या मुलीचा शोध घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले.
अविनाश कुसे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भागीरथ चहापान करण्यासाठी माझ्या हॉटेलमध्ये आले. त्यावेळी मला सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भागीरथ हे चिंतेत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी मी त्यांना काय झाले? असे विचारले. त्यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी एका अनाथ आश्रमातून एक अल्पवयीन गतिमंद मुलगी बेपत्ता आहे. मी या मुलीला मागील चार ते पाच तासांपासून शोधत आहे. मात्र, तिचा अद्यापही काही ठावठिकाणा लागलेला नाही.
भागीरथ यांनी ही बाब सांगितल्यावर मी बेपत्ता मुलीचा फोटो त्यांच्या परवानगीने सोशल मीडियावर शेअर केला. मी माझ्या मित्रांनाही WhatsApp च्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या मुलीचा फोटो पाठवला. त्यानंतर 15 मिनिटांतच माझा मित्र बाली शर्मा याचा मला फोन आला. त्याने बेपत्ता झालेल्या मुलीला वसई पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाच्या बस आगाराजवळ पाहिल्याचं सांगितले. त्यानंतर आम्ही तातडीने तेथे धाव घेतली आणि त्या मुलीला माझ्या हॉटेलमध्ये आणून लगेचच अनाथ आश्रमाच्या व्यवस्थापकांच्या ताब्यात दिले, असंही कुसे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.