Latest Mumbai News: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मुंबई उपनगरात २६ विधानसभा मतदारसंघातून ३२४ उमेदवार नशीब आजमावत आहेत.३२४ उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत ५८५ अर्ज दाखल केले आहेत.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याबाबत फारसा प्रतिसाद नव्हता. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत होती. आज अनेक राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच निवडणूक कार्यालयात गर्दी केली. अखेरच्या दिवशी एकूण उमेदवारी अर्जाची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून तेव्हा खरी लढत स्पष्ट होणार आहे.