Mumbai News: मुंबईतील महिला पुरुषांच्या तोडीस तोड काम करतात. नोकरदार महिलांपासून, मनोरंजनापासून ते बिझनेस क्षेत्रातही महिलांचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुंबई शहरात महिलांनी १.४३ टक्के तर उपनगरात ०.६६ टक्के अधिक मतदान केले आहे. मुंबई शहरात एकूण ५२.६९ टक्के तर उपनगरात ५६.३९ टक्के मतदान झाले आहे.
शहर जिल्ह्यात एकूण २५ लाख ४१ हजार ८१० मतदार असून त्यात १३ लाख ३९ हजार २९९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये सात लाख १० हजार १७४ पुरुष मतदार आणि सहा लाख २९ हजार ०४९ महिला मतदारांनी तसेच इतर ७६ मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी ५२.६९ टक्के आहे.