Mumbai News: दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कामाठीपुरा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या भागातील गल्ली ११, १२, १३ व १४ मध्ये देहविक्री करणाऱ्या महिला मतदारांची संख्या दोन हजारांवर आहे. कोविडच्या कठीण काळात मदतीला धावून येणाऱ्या पक्षाला, उमेदवारांना मतदान केल्याची भावना या महिलांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.