Mumbai : दहिसर येथे जल वाहिनी फुटली

दहिसर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.
Mumbai news
Mumbai newsesakal
Updated on

मुंबई : दहिसर पूर्व चेक नाका येथे अदाणी इलेक्ट्रिकसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरु असताना ९ इंचाची जल वाहिनी फुटली. पालिकेच्या जल विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि दहिसर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

दहिसर पूर्व चेक नाका, हारेम टेक्सटाइल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ अदाणी इलेक्ट्रिकसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरु असताना ९ इंचाची जल वाहिनी यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेले. जल विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि मंगळवारी पहाटे ४ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यान, जल वाहिनी फुटल्याने कुठल्याही विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचे जल विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.