Mumbai Water News: पाणीटंचाईचे संकट दूर झाले असताना आता मुंबईकर दूषित पाणी या नव्या संकटाला सामोरे जात आहेत. उमर खाडी, डोंगरी, दादर, माटुंगा, धारावीत सर्वाधिक गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पालिकेने ठोस पावले उचलली नाहीत तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा मुंबईला होतो, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो; मात्र मुंबईचे पाणी दूषित असल्याचे पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालातून उघडकीस आले आहे. दरम्यान, पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.
असा होतो पाणीपुरवठा
मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी भांडुप येथील पाण्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच मुंबईला दररोज करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. तरीही गोळा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यात कोला बॅक्टेरिया आढळतात.
काय आहे अहवालात?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी दूषित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये जलाशयातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता ०.३ टक्के कोला बॅक्टेरिया आढळले होते; तर २०२१ मध्ये यात घट झाली, परंतु २०२२-२३ मध्ये दूषित पाणी असल्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि ०.३ टक्के पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.
येथे आहे मोठी समस्या
उमरखाडी, डोंगरी, दादर, माटुंगा, धारावी, खार, वांद्रे, सांताक्रूझ, बोरिवली या भागात पाणीपुरवठ्यात दूषित पाणी आढळले आहे.
दूषित पाण्याची आकडेवारी टक्क्यांमध्ये
उमर खाडी डोंगरी ६.७ टक्के
बोरिवली २.१ टक्के
दादर १.७
माटुंगा १.७
धारावी १.७
खार १.६
वांद्रे १.६
सांताक्रूझ १.६
दररोज तपासणी
मुंबईला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता राहावी यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डांतून दररोज २०० पाण्याचे नमुने घेण्यात येतात. पालिकेच्या आरोग्य विभाग व जल विभागाकडून पाण्याचे नमुने गोळा केले जातात. गोळा करण्यात येणारे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पालिकेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.
पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते असा दावा पालिकेने केला आहे, परंतु पाण्याची तपासणी योग्य प्रकारे केली जात नसल्याचे दिसते. पाण्याची तपासणी केली असती तर इतके दिवस गढूळ पाणी आलेच नसते. याची चौकशी करावी.
- माधव प्रधान, दादर
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रक्रिया करून पाण्याचा पुरवठा होत असेल तर इतक्या विभागांना दूषित पाणी येते कसे, हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे.
- रवी सावंत, धारावी
ऑक्टोबर हिट सुरू आहे. त्यात असे दूषित पाणी मिळत असेल तर रोगराई वाढेल. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारावी. पालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- अनुराधा पाटील, बोरिवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.