मोखाडा. दि. - मुंबईची तहान भागवण्यासाठी मोखाड्यात मध्यवैतरणा धरण बांधण्यात आले आहे. धरण क्षेत्रात जमीन पाण्याखाली गेल्याने अनेक आदिवासीं कुटूंबाना शासनाने कुठलीही भरपाई दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ऊपासमारी ओढवली आहे.
या प्रकल्प ग्रस्त पीडीत आदिवासी कुटूंबानी या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी येणार्या अधिकार्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोखाड्यात खळबळ उडाली आहे.