Mumbai Water Supply : मुंबईकरांना यंदा पाण्याचे नो टेन्शन

Mumbai BMC : मुंबईसाठी राज्य शासनाने दिली अतिरिक्त पाणीसाठ्याची मंजुरी : महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी
Mumbai Water Supply
Mumbai Water Supplyesakal
Updated on

Mumbai Water Supply : मुंबई महानगरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गतवर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे.

त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याची काळजी करू नये; मात्र सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.

Mumbai Water Supply
Mumbai Water Storage : मुंबईत १० टक्के पाणी कपातीची टांगती तलवार

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील आजघडीला उपलब्ध पाणीसाठा व नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत आयुक्त दालनात बैठक झाली. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

या वेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे या वेळी उपस्थित होते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये दोन लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर गरजेच्या तुलनेत हा साठा १६.४८ टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.

हा सर्व साठा मिळून प्रतिवर्षाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत पुरेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. एकूणच पाणीसाठ्याच्या स्थितीवर महानगरपालिका प्रशासन सातत्याने व अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Mumbai Water Supply
BMC News: पालिकेचा दणका, मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटर गॅरेजवर जप्ती

प्रशासनाकडून सातत्याने आढावा

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. मे अखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तवले जाणार आहेत.

पावसाचे अंदाज आणि पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन आगामी काळातील धोरण निश्चित केले जाणार आहे.

Mumbai Water Supply
BMC Budget 2024: कोस्टल रोड ते 2,800 बेस्ट बसेस, मुंबईकरांसाठी BMCच्या अर्थसंकल्पात काय आहे खास?

नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये त्याचप्रमाणे सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनीदेखील आपल्या कार्यपद्धतीमध्ये पाणीबचतीच्या दृष्टीने बदल करणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याची बचत होईल, तसेच पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा आवाहन प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.

अश्या परिस्थितीत काय करायला हवे?

  • पाण्याचा काटकसरीने वापर करावा

  • आवश्यक तेवढे पाणी घ्यावे

  • आंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळावा

  • नळ सुरू ठेऊन दात घासणे, दाढी करणे टाळावे

  • घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नयेत

  • वाहने धुण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करावा

  • लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने पाण्याने नव्हे, ओल्या फडक्याने पुसावेत

  • नळ तसेच वॉश बेसिनच्या नळांचा प्रवाह कमी करणाऱ्या तोट्या लावाव्यात

  • उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना गरज असेल तेव्हा पाणी द्यावे

  • गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणीगळतीची तपासणी करावी.

Mumbai Water Supply
Water Shortage : वैजापूर तालुक्यात दुष्काळाची भीषणता; ११९ टँकरने ८८ गावे, वाड्यांना पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.