Mumbai Rain Video: पावसाच्या सरी अन् विजांचा कडकडाट! मुंबई, नवी मुंबईत मुसळधार; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Weather And Rain Updates: काल रात्रीपासून नवी मुंबई, कल्याण आणि पनवेल परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
Mumbai Rain Viral Video
Mumbai Rain Viral VideoEsakal
Updated on

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. असे असले तरी काल रात्रीपासून नवी मुंबई, कल्याण आणि पनवेल परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर मुंबईकर या पावसाचे आणि विजांच्या कडकडाटाचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

सर्वत्र मुसळधार

मुंबई आणि परिसरातील जिल्ह्यांना 26 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, काल तितका पाऊस झाला नाही. पण अखेर दिवसभराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नवी मुंबई महानगर परिसर, मुंबई आणि ठाणे येथे सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस सध्या पुढील दीड ते दोन तास सुरू राहण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Viral Video
Thane Crime News: पोलिस ठाण्यात येऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ला; विठ्ठलवाडी ठाण्यात नेमकं काय घडलं?

मुंबईतील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

दरम्यान हवामानशास्त्र विभागाने मुंबई परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान विभागने केले आहे.

हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट, पालघरला ऑरेंज अलर्ट व मुंबईला ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rain Viral Video
Akshay Shinde: आम्हाला धोका जास्त; किरीट सोमय्यांना दिले तसे संरक्षण द्यावे, अक्षयच्या वडिलांचे अमित शाहांना पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.