Maharashtra News: मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अशातच मुंबईचे तापमान ३४ अंशांच्यावर गेले असताना पावसाच्या काहीअंशी दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे मुंबईसह ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात आज 'यलो अलर्ट' असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रणालींमुळे मुंबईसह कोकणात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुंबईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होते. हवामान विभागानुसार रविवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, आठवडाभरात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.