मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली असून किमान तापमान काही अंशाने घसरले आहे. यामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडीचा लपंडाव मुंबईकरांना अनुभवास मिळत आहे. त्यातच थंडीची चाहूल लागली असून काही दिवसांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.