Mumbai News : भारतीयांसाठी वेडिंग डेस्टीनेशन सिंगापूर ने कोविड निर्बंध हटवले

सिंगापूर टुरिझम बोर्डाचे विभागीय संचालक जी. बी. श्रीथर व प्रदेश संचालक रेनजी वाँग यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली
Mumbai Wedding destination for Indians Singapore lifts Covid restrictions
Mumbai Wedding destination for Indians Singapore lifts Covid restrictionsesakal
Updated on

मुंबई : आग्नेय आशियातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या सिंगापूरने कोविड विषयक निर्बंध पूर्णपणे हटवले असून पर्यावरण पूरक पर्यटन व्यवसायावर त्यांनी भर दिला आहे. भारतीयांसाठी तेथे यावर्षीपासून वेडिंग-इव्हेंट डेस्टिनेशनही आयोजित केले जाईल.

Mumbai Wedding destination for Indians Singapore lifts Covid restrictions
Mumbai News : मुंबईतून क्लीनअप मार्शल आऊट; पालिका करणार ५ हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती

सिंगापूर टुरिझम बोर्डाचे विभागीय संचालक जी. बी. श्रीथर व प्रदेश संचालक रेनजी वाँग यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. आता सिंगापूर मध्ये कोविडपूर्व काळाप्रमाणेच पर्यटकांना कोविड चाचणी शिवाय किंवा लसीकरणाशिवाय प्रवेश मिळू शकतो.

सिंगापूरमध्ये कोविडच्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये १४ लाख भारतीय पर्यटक आले होते. त्यावेळी जागतिक पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटकांचा तिसरा क्रम होता. तर मागीलवर्षी सुमारे सात लाख भारतीय पर्यटक सिंगापूरमध्ये आले.

Mumbai Wedding destination for Indians Singapore lifts Covid restrictions
Mumbai News : मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट; पार्सल वाहतुकीतून २३२.५० कोटी रुपयांची कमाई !

यावेळी इंडोनेशिया मागोमाग भारतीय पर्यटकांचा दुसरा क्रमांक होता. मागील वर्षी आलेल्या भारतीय पर्यटकांपैकी सुमारे पन्नास हजार पर्यटक क्रूज मधून आले होते. सर्व देशांमधून सर्वात जास्त भारतीय पर्यटकच क्रूजमार्फत सिंगापूरला येतात. यामुळे आम्हाला भारतीय पर्यटकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असेही ते म्हणाले.

ग्लोबल सस्टेनेबल टुरिझम कौन्सिल तर्फे सिंगापूरला पर्यावरणपूरक पर्यटनस्थान असा दर्जा देण्यात आला असून असा मान मिळवणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश आहे. त्यासाठी पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व क्षेत्रांना पर्यावरणपूरक व्यवसाय करावा लागतो. त्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक तत्वे, नियम दिले असून त्यांची तपासणी केली जाते.

Mumbai Wedding destination for Indians Singapore lifts Covid restrictions
Mumbai : बारावे कचरा प्रकल्पातील कचरा पुन्हा पेटला...

सिंगापूरला येणाऱ्या भारतीय पर्यटकाचे सरासरी वय ३७ असून हे जगातील पर्यटकांपैकी सर्वात तरुण वय आहे. या तरुण पर्यटकांसाठी सिंगापूर हे लाईफस्टाईल, इव्हेंट, एंटरटेनमेंट यांचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तिवरांचे जंगल असलेल्या किनारपट्टीवरून कयाकिंग, परफ्युम मेकिंग कार्यशाळा, फॅशन डिझायनिंग असे अनुभव घेण्यासाठी सिंगापूरला येण्याचे आवाहनही श्रीथर यांनी केले.

एप्रिल ते जून या कालावधीत कुटुंबासाठी आदर्श पर्यटनस्थळ सिंगापूर अशी मोहीम पर्यटन विभागाने केली आहे. बिजनेस कॉर्पोरेट इव्हेंट स्कीम नुसार मोठ्या ग्रुपला काही विशेष सवलती देण्यात येतात.

Mumbai Wedding destination for Indians Singapore lifts Covid restrictions
Mumbai Crime News : 'त्या' सहा तासात नेमकं घडलं काय? घाटकोपरच्या जोडप्याच्या मृत्यूमागील गूढ वाढलं

तर आता यावर्षीपासून भारतीयांसाठी सिंगापूर हे वेडिंग डेस्टिनेशन किंवा सेलिब्रेशन डेस्टिनेशन केले जाईल. भारतातून १६ ठिकाणाहून सिंगापूरला येता येते. कोरोनापूर्वकाळात भारतीयांचे सिंगापूरला राहण्याचा कालावधी सरासरी ६.१ दिवस होता. तो आता कोरोना नंतर ७.८ दिवस झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.