Railway News: प्रशासनाची कळकळीची विनंती, लोकलचं काम महत्वाचं आहे कृपया...

Railway News
Railway Newssakal
Updated on

Railway News: उपनगरीय लोकल ट्रेनच्या पिक अवर्समधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबईतील खासगी आणि शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याची विनंती संबंधित कार्यालयांना पत्र पाठवून करणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी अलीकडेच उपलब्ध करून दिली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयात कामवर येणाऱ्या कर्मचाऱ्‍यांना दररोज लोकल गर्दीचा सामना करावा लागतो. अनेक कर्मचारी कल्याण, कसारा आणि कर्जतवरून दररोज सीएसएमटी विभागीय कार्यलयात येतात; मात्र लोकलमधील गर्दीमुळे कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी कार्यालयीन कामकाज दोन भागांत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Railway News
Mahrashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा उद्या फैसला; झिरवाळ म्हणतात, सरकार स्थिर व्हायला पाहिजे!

सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट; तर सकाळी ११.३० ते संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असणार आहे. या निर्णयामुळे अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या गर्दीपासून मुक्ती मिळणार आहे. १ नोव्हेंबर २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी कार्यालये, बँका, रुग्णालये, शाळा, खासगी कार्यालये, उद्योगांनी त्यांच्या कर्मचाऱ्‍यांना गर्दी टाळून लोकल प्रवास करता यावा म्हणून कार्यालयांच्या वेळेत बदल करावा, यासाठी विनंती करणारे पत्र मध्य रेल्वेकडून लिहिले जाणार आहे, असे रेल्वेकडून आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Railway News
Railway News: रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना मिळणार तत्काळ उपचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()