ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल मसाज घेणं ही आजकाल सामान्य बाब झाली आहे. विशेषतः एखाद्या कार्यक्रमापूर्वी महिला आवर्जून पार्ललला भेट देतातच. मात्र, अशाच प्रकराचा फेशिअल मसाज घेणं मुंबईतील एका महिलेला भरपूर महागात पडलंय. या महिलेचा चेहरा उजळण्याऐवजी चक्क भाजला गेल्याचा प्रकार समोर आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार १७ जून रोजी ही घटना घडली. या दिवशी ही महिला अंधेरीच्या कामधेनू शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या ग्लो लक्स या सलूनमध्ये गेली होती. याठिकाणी तिने हायड्राफेशिअल ट्रीटमेंट घेतली. यासाठी तिने १७,५०० रुपये खर्च केला. मात्र, यानंतर तिच्या चेहऱ्यावर जळजळ होत असल्याचं तिला जाणवलं.
चेहऱ्यावर सतत त्रास होत असल्यामुळे तिने डर्मेटॉलॉजिस्टला भेटून तपासणी केली. याठिकाणी तिला स्किन-बर्न झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या मसाजमुळे तिच्या चेहऱ्याला कायमचं नुकसान झाल्याचं डॉक्टरांनी सांगताच, या महिलेने पोलिसांत धाव घेतली. स्थानिक मनसे नगरसेवक प्रशांत राणे यांच्या मदतीने तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी सलून मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सलून कामगारांचा निष्काळजीपणा
राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलूनमधील कर्मचाऱ्यांनी या महिलेला ही रिअॅक्शन अगदी सामान्य असल्याचं सांगितलं. एक दोन दिवसांमध्ये तिच्या चेहऱ्यावरील डाग निघून जातील, असं त्यांनी या महिलेला सांगितलं. यावेळी या सर्वांचा वाद एवढा वाढला, की गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना मध्ये पडावं लागलं होतं.
"दुसऱ्या दिवशी ही महिला डॉक्टरांना भेटून आली. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला हे लिहून दिलं आहे, की या महिलेच्या चेहऱ्यावरचे डाग हे परमनंट आहेत. फेशिअलसाठी हलक्या दर्जाचे किंवा चुकीच्या प्रमाणात प्रॉडक्ट वापरल्यामुळे असं झालं आहे." अशी माहिती राणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.