Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मिहीर आणि ड्रायव्हरने गुन्हा केला कबुल, म्हणाले,'केलेल्या कृत्याचा पश्चाताप...'

Worli Hit And Run Case: वरळी येथील अपघातात महिलेचा जीव घेतल्यानंतर दोन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला मंगळवारी (ता. ९) बेड्या ठोकण्यात आल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले.
Worli Accident Case
Worli Accident Caseesakal
Updated on

वरळी येथील अपघातात महिलेचा जीव घेतल्यानंतर दोन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला मंगळवारी (ता. ९) बेड्या ठोकण्यात आल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले. मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अपघात प्रकरणातील दोन्ही आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघात झाला तेव्हा कारमध्ये मिहीर शाह आणि राजऋषी बिदावत हे उपस्थित होते. या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्याची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली आहे. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.

Worli Accident Case
Worli Hit And Run Case: 12 पेग व्हिस्की अन्...; अपघातापुर्वी मिहीरने काय घेतलं होतं? वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा

पोलिसांनी आरोपींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष अपघाताच्या रात्रीच्या समान क्रमाने एक दृश्य तयार केले. सीजे हाऊस वरळी ते सी लिंक वरळी रिक्रिएशन करण्यात आला. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.

असा आहे घटनाक्रम?

- शनिवारी रात्री तीन मित्रांसोबत मिहीर याने मद्यप्राशन आणि जेवण केले. रात्री ११.१५च्या सुमारास हे चौघे या बारमधून बाहेर पडले. अपघात घडलेल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसले. ही गाडी बोरिवलीच्या दिशेने निघाली.

- बोरिवली परिसरातच राहणाऱ्या तिन्ही मित्रांना घरी सोडल्यावर मिहीरने चालक बिदावत याच्याकडे लाँग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

Worli Accident Case
Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाच्या अडचणीत वाढ; कोर्टाने दिली १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

- गाडी मरीन ड्राईव्ह परिसरात आली. तेथून परत घरी जाताना मिहीरने गाडी चालविण्यास घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळी येथे मिहीरच्या गाडीने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर आले. त्याच वेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले. मात्र कावेरी यांची साडी चाकात गुरफटली. त्यामुळे त्या बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या.

- याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि पेशाने चालक असलेल्या बिदावत याला होती; तरी त्याच अवस्थेत दोन किलोमीटर अंतर कापल्यावर मिहीरने गाडी थांबवली. चालकाच्या मदतीने कावेरी यांना बाहेर काढले. रस्त्यावर ठेवले. तेथे चालकाने गाडीचा ताबा घेतला. त्याने कावेरी यांच्यावरून पुन्हा गाडी चढवत पुढे नेली.

- ही गाडी वांद्रे कलानगर येथे बंद पडली. तत्पूर्वी मिहीरने शिवसेनेचे उपनेते असलेल्या आपल्या वडिलांना, राजेश शहा यांना फोनवरून सर्व हकिगत सांगितली; मात्र मिहीरला पोलिस ठाण्यात पाठवण्याऐवजी शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच अपघाताची जबाबदारी चालक बिदावत याच्यावर ढकलण्याचा कट आखला. शहा यांनी या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा असलेली कारही गायब करण्याचा बेत आखला होता; मात्र वेळेत पोचलेल्या पोलिसांनी तो उधळला.

Worli Accident Case
Worli Hit And Run Case: राजेश शहा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कसा झाला, अंडरवर्ल्ड कनेक्शन काय? कुणी केला धक्कादायक आरोप

- कलानगर येथून काही अंतर पायी गेल्यानंतर मिहीर याने रिक्षा पकडली. सीसीटीव्ही चित्रणातून ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. कलानगर येथून तो गोरेगाव येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे सुमारे दोन तास त्याने झोप काढली. त्यानंतर तेथे आलेल्या बहिणीने मिहीर याला आपल्यासोबत नेले. गोरेगाव येथून तो बोरिवली येथे आपल्या घरी गेला. त्यानंतर मिहीर, त्याची आई, बहीण बेपत्ता झाले. तिघांनी आपापले फोनही बंद केले होते.

- रविवारी सकाळी वरळी पोलिसांनी शहा आणि बिदावत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री या दोघांना अटक करण्यात आली.

मिहीरसाठी देशभरातील विमानतळांना लूकआऊट नोटीस देण्यात आली. मिहीरच्या शोधार्थ विविध पथके तयार केली गेली.

Worli Accident Case
Worli Hit and Run Case: "मित्राचा मोबाईल ट्रेस केला अन् अख्ख कुटुंब..."; मिहीर शाह पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.