लॉकडाऊनमध्ये देशात मुंबईकर सर्वात जास्त टेन्शनमध्ये, पुणेकरांचा नंबर आहे...

लॉकडाऊनमध्ये देशात मुंबईकर सर्वात जास्त टेन्शनमध्ये, पुणेकरांचा नंबर आहे...
Updated on

मुंबई - कोणत्याही आव्हानांना निडरपणे सामोरं जाणारे मुंबईकर कोरोनामुळे उद्भवलेल्या आव्हानांना झेलण्यात कमी पडले आहेत. मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली असुन टीआरएच्या कोविड मेंटल वेलबीइंग इंडेक्सने मुंबईचा सर्वात कमी स्कोअर नोंद केला आहे. तर, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा सर्वोत्तम सामना करण्यात गुवाहाटी मागोमाग दिल्लीकर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची नोंद करण्यात आली आहे. 

टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट्स आणि ब्रँड अनॅलिटीक्स कंपनीने 16 शहरांतील 902 शहरी नागरिकांच्या मदतीने एक सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे. या अहवालात नागरिकांच्या मेंटल वेलबीइंग म्हणजेच सध्याच्या संकटाशी संबंधित असलेल्या चिंता हाताळण्याची क्षमतेवर भर दिला आहे. ज्यात मुंबईकर सर्वाधिक मागे आहेत. 

गुवाहाटी पहिल्या क्रमांकावर- 

कुटुंबीयांचे आरोग्य, कामाच्या बाबतीतील स्थिरता, देशाच्या आरोग्यावर आणि अर्थकारणावर होणारा परिणाम या भीतींचा सामना करण्याच्या क्षमतेबाबत गुवाहाटीतील रहिवाशांनी सर्वाधिक मेंटल वेलबीइंग स्कोअर आला आहे. गुवाहाटीच्या स्कोअर  84% इतका आहे. 

यानंतर, दिल्ली-एनसीआरचा स्कोअर 78% असून सर्वोत्तम मेंटल वेलबीइंग मध्ये दिल्लीने दुसरा क्रमांक पटकावला. नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगची ‘चांगली’ क्षमता दर्शवणाऱ्या शहरांमध्ये इंदोर 75%, कोइम्बतूर 73% तर पुणे 72% वर आहे. 

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. अनेकांची भूक दररोज काम केली तरंच भागते. या कारणांमुळे मुंबईचा सर्वात कमी, म्हणजे केवळ 28% मेंटल वेलबीइंग इंडेक्स स्कोअर आहे. म्हणजेच इथल्या नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा ताण आणि चिंता असल्याचे समोर आले आहे. यानंतर लखनऊचा 36% स्कोअरवर खालून दुसरा क्रमांक लागला आहे. 

टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी सांगितले, “या सर्वेक्षणाच्या बाबतीत मेंटल वेलबीइंग म्हणजे सध्याच्या संकटाशी संबंधित असलेल्या चिंता हाताळण्याची क्षमता. चिंतांचा सामना करण्याची क्षमता व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारित आहे. शिवाय, शहरात रुग्णांच्या संख्येत किती वाढ झाली आहे यावरही अवलंबून आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक कोविड-19 रुग्ण आढळले असून या विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्यानेही या आजाराचा सामना करण्याच्या बाबतीत लोकांच्या मेंटल वेलबीइंगवर परिणाम झालेला असू शकतो.”

मोठ्या शहरात सर्वाधिक चिंता

मोठ्या शहरांच्या तुलनेत लहान शहरांचा मेंटल वेलबीइंग इंडेक्स तुलनेने अधिक आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांच्या तुलनेत गुवाहाटी, जयपूर, इंदोर, पुणे, कोइम्बतूर ही शहरे परिस्थितीशी चांगल्या प्रकारे सामना करत आहेत. 

चिंता कमी करण्यासाठी काय कराल? 

  • कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या स्वतःमध्येच शांततेचा शोध घेणे गरजेचे आहे.
  • कोणत्याही परिस्थितीला स्वीकारण्याची क्षमता वाढवली पाहिजे. 
  • बदल हाताळणे शिकले पाहिजे. आव्हानात्मक कालावधीमध्ये अधिक ताकद आजमावणे आवश्यक आहे. 
  • घरीच राहून परिस्थितीचा सामना केला पाहिजे. 
  • सकारात्मक गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवावा.

mumbaikar are at bottom in TRA research mental well being score check detail report 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.