दिवाळीसाठी नागरिक उत्साही, मात्र तडजोडीनेच यंदाची दिवाळी करणार साजरी

दिवाळीसाठी नागरिक उत्साही, मात्र तडजोडीनेच यंदाची दिवाळी करणार साजरी
Updated on

मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबई शहरासह उपनगरांतील बाजारांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. असं असलं तरीही यंदाची दिवाळी मुंबईकर वाढलेल्या महागाईमुळे तडजोड आणि काटकसर करत साजरी करणार आहेत. कारण, कोरोनाचे संकट अजूनही मुंबईसह राज्यात कायम आहे. सध्याची परिस्थिती पाहता संपुर्ण बाजारावर कोरोनाची गडद छाया आहे. 

आजही नवीन कोरोनाबाधितांचे रुग्ण सापडत आहेत. राज्य सरकारने मागील काही दिवसात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंतचे सर्व सण साधेपणानेच साजरे केले गेलेत. त्याच पद्धतीने दिवाळी सण सुद्धा साजरा करणे अपेक्षित आहे. कारण परिस्थिती जरी सुधारत असली तरी ती कायमच तशीच राहील असे मत अजुनही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेले नाही. 

घरगूती मेहनतीला विश्रांती,  तयार फराळाला वाढती मागणी - 

यंदा दिवाळीला घरगुती पदार्थ बनवण्याची मेहनत वाचली असून तयार फराळाला वाढती मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. मात्र, त्या फराळाच्या मागणीलाही कमी प्रतिसाद असून लोक काटकसर करुन आनंद साजरा करत आहेत. आधी ऑफिस सुरु असल्याकारणाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून पॅकिंग केलेल्या फराळालाही मागणी होती मात्र, आता त्यावरही परिणाम झाला आहे. आधी लोक 5 - 5 किलोची ऑर्डर द्यायचे पण आता 1 किलोची ऑर्डर देतानाही विचार करत असल्याचे लालबागमधील व्यावसायिक सुजित खामकर यांनी सांगितले. 

कंदील व्यवसायावर ही परिणाम - 

गेल्या अनेक वर्षांपासून माहीमची कंदील गल्ली वेगवेगळ्या आकारांच्या कंदील विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या कंदील व्यवसायावरही परिणाम झाला आहे. आधी हा व्यवसाय 100 टक्के हा व्यवसाय व्हायचा, मात्र यंदा 20 ते 30 टक्के होईल अशी अपेक्षा आहे. दरवर्षी कंदील विक्रेते चार ते साडे चार हजार कंदिलाची विक्री करायचे मात्र, यावर्षी फक्त 1 ते दिड हजार कंदील माहीमच्या विक्रेत्यांनी विकायला आणले आहेत. शिवाय, बाजारात माल ही कमी प्रमाणात आल्याने पुर्ण बाजारावर याचा फटका बसला असलयाचे कंदील विक्रेते वैभव पेडणेकर यांनी सांगितले आहे. यावेळी कच्चा माल उपलब्ध झाला नसल्याने नव्याने कंदिल जास्त तयार केले गेले नाहित. दरवर्षी दिवाळीला आम्ही हजाराच्यावर कंदील तयार करतो. शिवाय, बाजारातूनही होलसेलमध्ये विकत आणतो. यावर्षी सगळ्याचेच प्रमाण कमी झाले आहे. अशी त्यांनी सांगितलं. 

फटाक्यांना ही बंदी - 

भारतासह महाराष्ट्रात आलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे बुडाले. शासनाकडून टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या अनलाॅकमुळे व्यापारी वर्ग तर सुखावला. मात्र, आर्थिक कुंचबणेमुळे ग्राहक संख्येत मात्र घट झाली अशातच दसऱ्यानंतर दिवाळी आली. मात्र, यावर्षी फटाके बाजारात मंदी दिसते आहे. या सणावारांच्या वेळेस काेणी पणत्या, दिवे, फराळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाेभेचे आणि आतषबाजीचे फटाके यांचा व्यवसाय करतात. मात्र, दरवर्षीप्रमाणे फटाके खरेदीकरिता असणारा उत्साह मात्र कुठेच दिसून येत नसल्याचे बहुसंख्य किरकाेळ व घाऊक फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यावर्षी दिवाळी साजरी करावी की नाही, या संभ्रमात नागरिक असल्याचे दिसत आहे. दरवर्षी दिवाळीच्या पूर्व आठवड्यात ग्राहकांची फटाके खरेदी करण्यासाठी ओढ असायची. मात्र, या वर्षी खुद्द फटाक्यांच्या घाऊक व्यापाऱ्यांना ग्राहकांची वाट पाहत बसण्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत सर्व गाेष्टी पाहता यावर्षी फटाका व्यावसायिकांवरही नागरिकांचे म्हणणे आहे. 

दरवर्षीप्रमाणे फटाक्यांना ग्राहक पसंती देत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी या आठवड्यात आमच्या हाेलसेल विक्रेत्याकडेही लाइन लागलेली असते. मात्र, यंदा अशी परिस्थिती कुठेच दिसून आली नाही. तरीदेखील आम्ही फटाके लहान मुलांना आवडणारे आणि आवाज न करणारे फटाके विक्रीसाठी ठेवले आहेत, असे फटाके विक्रेते सुजित खामकर यांनी सांगितले आहे.

mumbaikar are excited to celebrate diwali but with limited expenses

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.