मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेने ४५ वर्षावरील (fourty five above)व्यक्तींना कुठल्या केंद्रांवर लस घेता येईल, त्याची यादी प्रसिद्ध केली आहे. बीएमसी (BMC) आणि सरकारी केंद्रांवर लसीकरण होणार आहे. कुठल्या केंद्रांवर (vaccination centre) आणि लसीकरणाची वेळ काय आहे?, त्याची माहिती BMC ने दिली आहे. लसीकरण केंद्रांबरोबरच मुंबईत ड्राइव्ह इन लसीकरण सुद्धा सुरुच आहे. (Mumbaikars heres a list of BMC and govt vaccination centre functioning on May 10 for fourty five above)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड जागरुकता निर्माण झाली आहे. नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी दररोज बाहेर पडत आहेत. पण लसीकरणासाठी तितका साठाच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना लसीशिवाय माघारी परतावे लागत आहे.
अनेक केंद्रावर लसीच नसतात, पण नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे आता स्लॉटसाठी नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. लसीकरणावरुन काही केंद्रांवर बाचाबाची झाल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत. गर्दीमुळे लसीकरण केंद्रच कोविड प्रसारक केंद्र बनण्याचा धोका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.