मुंबई : गणपतीचे आगमन झाल्यानंतर रविवार (ता.23) पासून विसर्जन सुरु होणार आहे. भक्तांना विसर्जन मार्ग कळवा यासाठी महापालिकेने विसर्जन स्थळांवर जिओ टॅगिंग केले आहे.
कोव्हिडमुळे यंदा चौपाट्या तलावातील विसर्जनावर महापालिकेने बंदी आणली आहे. शहरातील 70 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर पालिकेने मुर्ती संकलन केंद्र सुरु केले आहे. तर यंदा कृत्रिम विसर्जन स्थळांची संख्या 100 हून अधिकने वाढवून 167 करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी मुर्ती संकलन केंद्रही सुरु करण्यात आले असून तसेच काही विभागात फिरती विसर्जन केंद्रही करण्यात आली आहे.
नागरीकांना विसर्जन केंद्राची माहिती होण्यासाठी पालिकेने त्या ठिकाणा जीओटॅगिंग केले आहे.सोबत दिलेल्या लिकवर क्लिक करुन जवळील विसर्जन स्थळाचा मार्ग कळू शकेल.
http://stopcoronavirus.mcgm.gov.in/ganesh-visarjan-locations
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.