बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच

मुंबई लोकल बद्दलचा निर्णय आठवडाभरात होणार
बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच
Updated on
  • मुंबई लोकल बद्दलचा निर्णय आठवडाभरात होणार

मुंबई: लॉकडाऊनमध्ये (Lockdown) शिथिलता मिळाली असली तरी अद्याप सामान्य प्रवाशांना (General Public) लोकल प्रवासाची (Local Trains) परवानगी नाही. त्यामुळे सोमवारच्या दिवशी बेस्ट बसेससाठी (BEST Buses) मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसलं. बाजार पेठेतही गर्दी दिसून आली. काही ठिकाणी उपहारगृह (Hotels) ग्राहकांसाठी सुरु केली हाेती तर काही विभागात पार्सल सेवा (Parcel Service) सुरु होती. या सर्व गोष्टींमध्ये, आठवडाभरात लोकल प्रवासाबाबत निर्णय होण्याची शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.(Mumbaikars stand in Long Queues for BEST Buses as Local Trains are not running for General Public)

बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच
Lockdown Effect: मुंबईतील 5-स्टार 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कार्यालये, लघुउद्योग 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, सामान्य प्रवाशांना अद्याप लोकल प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. तर, अत्यावश्‍यक सेवांची व्याप्ती वाढवली असून काही क्षेत्रातील नोकरदारांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज लोकलमध्येही गर्दी पाहायला मिळत होती.

बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच
आजोबांची पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; अखेर गुन्हा दाखल

बेस्टमध्ये आता आसनक्षमतेच्या 100 टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, लोकल सामान्यांसाठी बंद असल्याने बेस्टच्या बसेससाठी गर्दी दिसत होती. उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नसल्याने पहिल्या काही थांब्यानंतर प्रवाशांना बसमध्ये प्रवासच करता येत नव्हता. तर, बाजारातही आज गर्दी दिसत होती. प्रामुख्याने पावसाळ्याच्या खरेदीसाठी मोठ्या बाजारपेठेतही गर्दी दिसली.

बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच
किमान 'यांना' तरी लोकल प्रवासाची मुभा द्या; संघटनेची मागणी

कोविड पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांच्या खाली असल्यास लोकल सामान्य प्रवाशांना सुरू करता येणार आहे. याबाबत आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता महापौरांनी व्यक्त केली. मुंबईचा पाॅझिटिव्हिटी दर 5.56 टक्के आहे. मात्र, लोकल सुरु असताना फक्त मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घेण्यात येणार नसून महामुंबईतील सर्व महानगर पालिकेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.