Good Morning Mumbai...! नव्या चैतन्यासह मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक सुरू; मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्क पुन्हा गजबजले

Good Morning Mumbai...! नव्या चैतन्यासह मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक सुरू;  मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्क पुन्हा गजबजले
Updated on

मुंबई : लॉकडाऊन पाचमध्ये राज्य सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे तब्बल तीन महिनांनी शिवाजी पार्क, फाईव्ह गार्डन, दादर चौपाटी, चौपाटी, मरीन ड्राईव्ह ही ठिकाण खुली करण्यात आली. लॉकडाऊमुळे घरातच अडकून पडलेले नागरिक मोकळा श्वास घेत आहेत. 

राज्य सरकाने 3 जून पासून कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मॉर्निक वॉक, रनिंग, सायकलिंग करण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर मुंबईत पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या नागरिकांना बाहेर पडता आले नव्हते. सध्या सकाळी वातावरण चांगल्या असल्याने अनेक नागरिक मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकचा आनंद घेत आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे गेले तीन महिने लोकांना बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे दररोजचे फिरणे थांबल्याने घरात लोकांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत होते.  आता परवानगी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंद आहे. तीन महिन्यांनी लोकांनी मरीन ट्राईव्ह येथील समुद्र पाहिला तर लॉकडाऊमध्ये शिवाजी पार्कमध्ये निरव शांतता होती. आता पुन्हा शिवाजी पार्क येथे लोकांची ये-जा काही प्रमाणात सुरू झाली. पावसाच्या सरीने बहरलेल्या निसर्गाचे दृश्य लोकांनी आज पहिल्यादाच डोळ्यात साठवले. इक्या महिन्याची  लोकांच्या मनावरील मरगळ बाहेर पडल्याने दूर झाले. थोडेसे का होईना मन प्रफुल्लित झाले. परंतु अजून कोरोनाचे संकट टळले नसल्याने लोक फारशी बाहेर पडण्यास उत्सुक नसल्याचे निदर्शनास येत आहे.

काही ठिकाणे मैदाने सुरू
मॉर्निग वॉक, सायकलिंग, जॉगिंग  परवानगी दिली आहे. मात्र बागांमधील व्यायामाचे साहित्य, ओपन एअर जीमधील साहित्य , खेळाच्या मैदानावरील स्विंग्ज, बार्स यासारखे साहित्य वापरता येणार नाही, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे.  मुंबई महापालिकेने काही ठिकाणी मैदाने सुरू केली. लोक सुरक्षित शारिरिक अंतर ठेवत आणि तोंडाला मास्क लावून मॉर्निंग वॉकला जात आहे. सध्या तरी प्रमाण कमी आहे. पण सोमवार पासून जनजीवन सुरळीतपणे सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.