Mumbai News: मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागानेही पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील २० उड्डाणपुलांवरील दुभाजकांमध्ये तब्बल दोन हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या कुंड्यांमध्ये लवकरच बोगलवेल बहरणार आहेत, त्यामुळे उड्डाणपूलांचे रुपडे पालटणार असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे.
भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात उद्यानविद्या प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनातही तब्बल दहा हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. आता उद्यान विभागाने मुंबईतील २० उड्डाणपुलांची निवड करून तेथे बोगनवेल फुलांच्या २ हजार कुंड्या ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण करून या २० उड्डाणपुलांची निवड केली आहे. ही निवड करताना तसेच या दुभाजकांमध्ये बोगनवेलीची फुलझाडे लावल्यानंतर वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या उड्डाणपुलांवरील दुभाजक अधिकाधिक रुंद असतील, अशाच पुलांची निवड केली आहे.
वाहनधारकास उड्डाणपुलांवरील प्रवास हा प्रसंगी रुक्ष वाटू शकतो. तसेच उन्हाच्या झळादेखील उड्डाणपुलावर अधिक लागतात. त्यामुळे उद्यान विभागाने या पुलांवरील दुभाजक पाना-फुलांनी सजविण्याचा निर्णय घेतला आहे.
जेणेकरून प्रवास सुसह्य होईल. विशेष म्हणजे बोगनवेल कमी पाण्यात वाढते आणि अधिक काळ टवटवीत राहते. त्यामुळे उद्यान विभागाने बोगनवेल पर्यायाची निवड केली असल्याचे सांगण्यात आले.
अधेरी येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दहिसर येथील जोड रस्ता (लिंक रोड), वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) कडून वाकोलाकडे जाणारा उड्डाणपूल, मीलन उड्डाणपूल, लालबाग उड्डाणपूल, मालाड येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरीवली राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल, मागाठाणे उड्डाणपूल, सुधीर फडके उड्डाणपूल, एल विभागातील सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता उड्डाणपूल, राजयोगिनी ब्रह्मकुमारी ब्रुजिंद्र दादीजी उड्डाणपूल (शीव पूल), नंदलाल डी. मेहता उड्डाणपूल (माटुंगा उड्डाणपूल), नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल (दादर उड्डाणपूल), एम पूर्व विभागातील पूर्व मुक्त मार्ग, एम पूर्व विभागातील गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता उड्डाणपूल, एम पूर्व विभागातील शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल, मुलुंड पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, शीव-वांद्रे जोड रस्ता, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, घाटकोपर विभागातील पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, चेंबूर विभागातील पूर्व मुक्त मार्ग, चेंबूर येथील सुमन नगर जंक्शन ते चंदननगर वाहतूक दिव्यांपर्यंतचा भाग बोगनवेलने बहरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.