Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्या होणार कचरा मुक्त; जाणून घ्या काय आहे मनपाचा प्लॅन!

झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्या होणार कचरा मुक्त; जाणून घ्या काय आहे मनपाचा प्लॅन!
Updated on

Mumbai News: मुंबईचा बहूतांश भाग झोपडपट्टयांनी व्यापला असून झोपडपट्ट्या अस्वच्छ आहेत. झोपडपट्ट्यामुधील छोटे नाल्याची सफाई होत नाही. त्यामुळे रोगराई वाढते. सुमारे 60 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.

मात्र झोपडपट्टयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. ही समस्या लक्षात घेवून पालिका आता झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेकडे लक्ष देणार आहे. झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्या होणार कचरा मुक्त; जाणून घ्या काय आहे मनपाचा प्लॅन!
Navi Mumbai News: दोन बांगलादेशींना खिडुकपाड्यातून अटक

स्वतंत्र धोरणाअंतर्गत प्रत्येक झोपडपट्ट्यांमधील स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून झोपडपट्टीतील कचरा, गटारे, नाल्यात कचरा टाकल्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार धरले जाणार आहे.

संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत आता झोपडपट्टीत कचरा मुक्तीचे उद्धिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. महापालिकेच्या प्रस्तावित धोरणानुसार झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्या होणार कचरा मुक्त; जाणून घ्या काय आहे मनपाचा प्लॅन!
Mumbai News : खुशखबर! ५८५ गिरणी कामगारांना मिळणार हक्काचे घर

झोपडपट्टयांमधील गल्ल्यांची, छोट्या गटारांची सफाईसाठीदेखील स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल. ही गटारे वर्षभर अनेक वेळा स्वच्छ करावी लागणार आहेत. झोपडपट्टीनजीक असणाऱ्या छोट्या नाल्यांची स्वच्छता राखणे, पावसाळ्याआधी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असे नव्या धोरणांतर्गत ठरविण्यात येणार आहे. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या सफाईची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असेल असेही ठरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. आता झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईत दररोज ४० हजार कर्मचारी साफसफाईचे काम करतात. झोपडपट्ट्यामध्ये परिणामकारक स्वच्छता होत नसल्याने आता झोपडपटट्यांच्या स्वच्छतेवर पालिका लक्ष केंद्रीत करणार आहे.

Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्या होणार कचरा मुक्त; जाणून घ्या काय आहे मनपाचा प्लॅन!
Mumbai Local News : 87 लोकलचा खोळंबा, नेमकं प्रकरण काय? | Mumbai News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.