मुंबई : मुंबईमधील कोरोना (Corona Cases In Mumbai) रूग्ण्यांच्या संख्येत मोठी घट नोंदविण्यात आली असून, गेल्या 24 तासांत केवळ 846 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,297 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत सध्या 7,135 सक्रिय रुग्ण असून, रूग्ण दुप्पटीचा दर 662 दिवसांवर नोंदविण्यात आला आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi)
मुंबईत कोरोना रूग्ण बरे होण्याच्या रेटमध्ये वाढ नोदविण्यात आली असून, गेल्या 24 तासांत सात जणांचा मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी होणारी रूग्णसंख्या पाहता मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आटोक्यात आल्याचे चित्र आहे. ज्यावेळी कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron) लागण होणाऱ्यांची संख्या वाढत होती त्यावेळी मुंबईमध्ये 20 हजारांपुढे कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत होती. त्यामुळे मुंबईसह राज्यातदेखील कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली होती. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्केंवर पोहचला आहे. (Corona Restriction In Mumbai)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.