Mumbra: ड्रग्ज तस्करांच्या रडारवर पुन्हा ‘मुंब्रा’; सलमानच्या अटकेमुळे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय!
Mumbra : नाशिकचा ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीचे जाळे उखडून काढण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. त्यातील एक आरोपी म्हणून मुंब्रातील सलमान फाळके याचे नाव उघड झाल्याने ‘मुंब्रा’ परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. सलमान फाळकेला मुंब्रा येथून अटक केल्यावर या परिसरात अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक सलमान करतो का? याची चाचपणी सध्या पोलिसांनी सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंब्रा कौसा परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात कॉन्व्हेन्ट शाळांबरोबर महागड्या मोठमोठ्या महाविद्यालयांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे ऑनलाईन गेम बरोबरच अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून अनेकदा समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंब्रा पोलिसांत अनेक ठिकाणी एमडी पॉवडर, कोकेन, गांजा, अफु, ब्राऊन शुगर अशा अमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मुंब्रा व कौसा परिसरात अनेक तरुण रात्री आणि संध्याकाळी मुंब्र्यातील डोंगर परिसरात नशा करताना दिसतात.
याआधी खाडी किनारी आणि स्थानक परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अंमली पदार्थ विक्री करताना अनेक तस्करांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच नाशिक, पुणे शहरातून उच्च वस्तीतून हे नशेचे पदार्थ मुंब्र्यात पोहचतात कसे? या मागे कोणती गुन्हेगारी टोळी कार्यरत आहे, याचा सध्या पोलिस शोध घेत आहेत.
आतापर्यंत २१८ आरोपी गजाआड
पोलिसांनी कळवा मुंब्रा परिसरात अमली पदार्थांचा एक कोटी रुपये किमतीचा साठा हस्तगत केला आहे. मुंब्र्यात १८ मे २०२३ मध्ये नऊ लाख १५ हजार रुपये किमतीच्या कफ सिरपच्या कोरेक्स बॉटल पोलिसांनी जप्त करत पाच आरोपींना अटक केली होती.
तसेच कळव्यात २२ ऑगस्टमध्ये कळवा नाका येथे गांजा आणि एमडी पावडर विकणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली होती. तर ठाणे परिसरातून जुलै २०२२ ते जून २०२३ या वर्षांत २० जणांवर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.