Crime News: निर्दयी जन्मदाते! चौथ्या मुलीची जीभ कापली, पाचवीही मुलगीच झाली म्हणून आई-वडिलांनी चिमुरडीची केली हत्या

Crime News: दोन मुले आणि तिसऱ्या मुलीनंतरही आणखी दोन मुली झाल्याने 18 महिन्याच्या मुलीची हत्या करून आणि तिचा मृतदेह पुरला. तर दुसऱ्या मुलीची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

Crime News: मुंब्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुले आणि तिसऱ्या मुलीनंतरही आणखी दोन मुली झाल्याने 18 महिन्याच्या मुलीची हत्या करून आणि तिचा मृतदेह पुरला. तर दुसऱ्या मुलीची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आई नुरानी जाहीद शेख (28), वडील जाहीद सलामत शेख (38) याना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ताब्यात घेतलं आहे. या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि ती आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुतळ्याची कबुली दिली आहे. दीडवर्षाच्या चिमुरडीची हत्या करून हत्येनंतर दाम्पत्यांनी १९ मार्च रोजी रात्री २-३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह पुरला. मात्र ४ एप्रिल रोजी संतोष महादेव या बनावट नावाने प्राप्त झालेल्या अर्जमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला. अटक दाम्पत्याला न्यायालयात नेले असता १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

Crime News
Maratha Reservation: पुढारलेल्या मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन; सदावर्तेंचा युक्तीवाद

याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास करत संशयावरून आई नूरानी आणि वडील जाहिद यांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुंब्रा पोलिसांनी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. शेवटच्या झालेल्या दोन मुली हबीब आणि लबीबा दाम्पत्याला नको होत्या. यापूर्वी हबीबा हिची जीभ कापल्याप्रकरणी झारखंड राज्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Crime News
Bombay HC: रात्रभर चौकशी करता येणार नाही, झोपेचा अधिकार ही मानवी गरज; उच्च न्यायालयाने ईडीला सुनावलं

तब्बल 28 दिवसानंतर मुंब्रा पोलिसांना बनावट नावाने अर्जदार संतोष हरिलाल महादेव नावाने प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात नेले असता 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

Crime News
मोठी बातमी! सोलापूर शहर- जिल्ह्यातील बेपत्ता १००९ महिला-मुलींचा शोध लागेना; जानेवारी २०२१ ते मार्च २०२४पर्यंतची स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.