Mumbra Shiv Mandir : पुरातन ‘मुंब्रेश्वर’ मंदिराची तुम्हाला माहिती आहे का ?

mumbra shiv mandir
mumbra shiv mandir sakal
Updated on

Mumbra Shiv Mandir : मुंब्रा पूर्वेला असलेली खाडी व पश्‍चिमेला असलेला पारसिक डोंगर यांच्यामध्ये डोंगरावर मुंब्रादेवीचे मंदिर आहे. तिच्या पायथ्याशी हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर आहे. या डोंगराच्या पुढच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले पुरातन असे ‘मुंब्रेश्र्वर महादेव मंदिर’ आहे. हे मंदिर मुंब्रा रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर आहे.श्रावण महिन्यात अभिषेक करण्यासाठी आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची येथे अलोट गर्दी होत आहे.

पारसिक डोंगरपायथ्याच्या निसर्गाच्या रम्य वातावरणात साडेतीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरासमोरील तलाव तर त्यापूर्वीचा असल्याचे जाणकारांचे मत आहे. या शिवमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या महादेवाची पिंडी ‘बिबवा’ वृक्षाखाली आणि काळभैरवची मूर्ती ‘जांभूळ’ या वृक्षाखाली सापडली आहे. हे जुने वृक्ष अजूनही तेथे बहरलेले आहेत. सीताराम महाराज यांनी १०० ते १५० वर्षांपूर्वी या मंदिराची डागडुजी करून त्याचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे मुंब्रेश्वर महादेव पिंडी व समोर असलेला नंदी, श्री गणेश, हनुमान व काळभैरव या सर्व मूर्ती हाताने बनविलेल्या अथवा बाहेरून आणलेल्या नसून या सर्व मूर्ती स्वयंभू स्थानातील आहेत.

mumbra shiv mandir
Mumbai Ganpati Festival : संपूर्ण मुंबईत मुर्तीकारांची रंगकाम करण्यासाठी लगबग

तसेच या परिसरात खोदकामातून हनुमानाची भली मोठी मूर्ती सापडली आहे. त्यामुळे या परिसराला हनुमानाचा डोंगर असे म्हटले जाते. मराठी भाविकाबरोबरच उत्तर भाषिक, मारवाडी, गुजराती भाषिक या मंदिरात नवस फेडण्यासाठी अभिषेक करण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात. या मंदिरात गेल्या ७५ वर्षांपासून येथे दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा केला जातो.

mumbra shiv mandir
Mumbai Politics : भाजप मुंबईमध्ये मोठ्या फेरबदलाच्या तयारीत; विद्यमान खासदारांचे पत्ते होणार कट?

सध्या मंदिराचा कारभार ट्रस्टचे ट्रस्टी हिरालाल गुप्ता व भोळेस्वर पाटील पाहतात. मंदिरात वर्षभर विविध उपक्रम, भजन, कीर्तन, व भंडारे आयोजित केले जातात. गेल्या अधिक श्रावण मासापासून आतापर्यंत जवळपास २५ ते ३० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. या मंदिराच्या प्रसादलयात दररोज महानैवद्य तयार केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.