मुंबईतल्या लॉकडाऊन संदर्भात पालिका आयुक्तांनी दिली मोठी माहिती

मुंबईतल्या लॉकडाऊन संदर्भात पालिका आयुक्तांनी दिली मोठी माहिती
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच मुंबईतून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे मुंबईतील कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. खुद्द मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात एकीकडे ठाणे, पुणे, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुंबईतही असा लॉकडाऊन जाहीर करणार का असा प्रश्न उद्भवू लागला. त्यावर स्वतः पालिका आयुक्तांनी मुंबईतल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर गेला आहे आणि रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा अपेक्षित असल्याचं म्हणत म्हणूनच मुंबईत १०० टक्के लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही, असा खुलासा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलाय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.

परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि हो दिवसाला जवळपास १२०० नव्या रुग्णांची नोंद होतेय. यामध्ये ८० टक्के लोकांनी प्रवास केलेला आहे. इतर शहरांमधून ते मुंबईत आलेले आहेत,  असंही त्यांनी सांगितलं. 

मुंबई शहर देशातील कोरोनाचं हॉटस्पॉट केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९० हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबईप्रमाणे आता मुंबईतही १०० टक्के कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार की काय अशी भीती मुंबईकरांना वाटू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर  मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईकरांची भीती दूर केली आहे. 

वसई-विरार, मीरा भाईंदर आणि मुंलुंड भांडूप यांच्या सानिध्यात असल्याने दहिसरच्या पश्चिम पट्ट्यात प्रभाव पडला असल्याचंही त्यांनी सांगितलं. जर हे वॉर्ड सोडले तर दिवसाला फक्त ३०० नवे रुग्ण सापडत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

चेस द व्हायरस मोहिमेचा फायदा 

मुंबई महापालिकेनं चेस द व्हायरस या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील रुग्ण शोधण्यासाठी कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं. आपण चाचणीच्या सुविधा वाढवल्या असून दिवसाला ६५०० पेक्षा जास्त चाचण्या केल्या जाताहेत. मुंबईत रोज ४ ते साडेचार हजार होणाऱ्या कोरोना चाचण्या वाढवून आम्ही रविवारी ६८०० चाचण्या केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

आम्ही १ जूनपासून काही निर्बंध शिथील केलेत. दिवसाला रस्त्यावर जवळपास १ कोटी लोक प्रवास करताहेत. तरीही दिवसाला फक्त १२०० रुग्णांची नोंद होत आहेत. याचा अर्थ व्हायसरला चेस करण्याची आपली योजना यशस्वी ठरली असल्याचं त्यांनी म्हटलं. 

सरासरी ४ हजार चाचण्यांमध्ये १३०० ते १४०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायचे. तर ६८०० चाचण्यांमध्ये केवळ १२४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. त्यातही केवळ २०० रुग्ण हे रुग्णालयात दाखल करण्याच्या अवस्थेतील असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील काही दिवसात पालिका केसेस दिवसाला ५०० ते १००० वर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलंय. 

मुंबई शहरात आपण महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या अगदी जवळ असून आर रेट (कोरोनाची लागण होण्याचा रेट) १.१ असल्याचं त्यांनी सांगितलं. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं गेल्यास १.० च्या खाली रेट गेल्यास महामारी संपली आहे.

मुंबईतल्या रुग्णालयांची परिस्थितीदेखील सुधारली आहे. मुंबईतील रुग्णालयं सध्या जवळच्या शहरांमधील पकडून दिवसाला १००० रुग्णांवर उपचार करताहेत. कोरोना चाचण्या वाढवताना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील खाटाही वाढवल्या. अतिदक्षता विभागातील खाटा, संस्थात्मक विलगीकरण व्यवस्थेचाही विस्तार केला, असल्याची माहिती त्यांनी दिली. 

सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण खाटांपैकी ७००० खाटा रिकाम्या आहेत. तर अतिदक्षता विभागातील २५० खाटा रिकाम्या असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं.

मुंबईत २२ हजार ऍक्टिव्ह केसेस असताना ठाण्यात ३२ हजार केसेस असणं चिंतेता विषय आहे.  मुंबईप्रमाणे चेस द व्हायरस ही मोहिम अन्य आणि आजूबाजूच्या शहरांनी स्विकारलं पाहिजे, असंही ते म्हणालेत.

Municipal Commissioner iqbal singh chahal inform about mumbai lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.