Murbad | विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, आता प्रतीक्षा आहे ती उमेदवारांच्या नावांची आणि यातच, मुरबाड विधानसभा मतदार संघातून मनसेकडून संगीता चेंदवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
बदलापूर शहरातील दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी, गुन्हा नोंद होण्यासाठी आणि त्यांनतर उसळलेल्या जन आंदोलनात, महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसेच्या संगिता चेंदवणकरही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा असलेल्या संगिता चेंदवणकर यांचे राज ठाकरे यांनी जाहीर कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनाच उमेदवारी देण्याची चर्चा मनसेत रंगली आहे. लवकरच पक्षाकडून त्यांचे नाव जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.