Vidhansabha Election 2024 : बदलापूर मधील मनसेची 'ती रणरागिणी' आता विधानसभेच्या रिंगणात; संगिता चेंदवणकर यांच्या नावाची चर्चा

बदलापूर येथील शालेय चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात व त्यानंतरच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत.
mns women candidate sangita chendvankar
mns women candidate sangita chendvankarsakal
Updated on

डोंबिवली - बदलापूर येथील शालेय चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात व त्यानंतरच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केल्यानंतर आता त्यांना मनसे मधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.