नालासोपारा : विरार पश्चिम यशवंत नगर परिसरात तुलिप इमारतीवरून फेकलेले स्त्री जातीचे बाळाच्या हत्येचा उलगडा करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. इमारतीची तपासणी करून, एका घरातील बाथरूमच्या समोरील पायथना वरील सफेद डागावरून या सर्व घटनेचा उलगडा करण्यात आला आहे. 16 वर्षाच्या मातेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, अल्पवयात आलेल्या शाररीक सबंधातून बाळाचा जन्म झाला होता.
ही घटना लपविण्यासाठी जन्मताच बाळाला बाथरूमच्या खिडकीतून दुसऱ्या मजल्यावरून फेकले असल्याचे पोलीस तपासात अल्पवयीन मातेने कबुल केले आहे. याबाबत अल्पवयीन मातेच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात नवजात बाळाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर प्राथमिक उपचार करून, तिला भिवंडी बाल न्यायालया मार्फत सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. (Mumbai News)
कसा झाला बाळाच्या हत्येचा उलगडा
विरार पश्चिम तुलिप इमारतीत नवजात स्त्री जातीचे बाळ इमाती वरून फेकलेले मंगळवारी भेटले होते. या इमारतीत पोलिसांनी सुरवातीला तपासणी केली असता याठिकाणी कोणीही गरोदर माता नसल्याचे पोलिसांना समजले. पोलिस निरीक्षक विठ्ठल चौगुले, Psi अभिजित ट्रेलर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी तपास करीत असताना पोलीस कोनिस्टबाल इंद्रनील पाटील यांना काही गुप्त बातमी मिळाली होती. त्यांनी इमारतीमधील सीसीटीव्ही तपासले असता एक 16 वर्षाची मुलीचे पोट वाढलेले दिसले.
त्या सीसीटीव्ही मधील मुलीची ओळख पटवून तिच्या घरात जाऊन तपासणी केली असता घरात एक मुलगी, दोन मुलं, तिचे आई वडील आणि 3 कुत्रे आढळून आले, घराची तपासणी करताना बाथरूमच्या समोरील पायथनावर एक सफेद रंगाचा डाग दिसला, त्यानंतर त्यांनी बाथरूम चेक केला तर बाथरूम पूर्णपणे धुतला होता. मोबाईल लाईट लावून बाथरूम मधील काचा पाहिल्या असता त्यावर तुरळक रक्ताचे डाग दिसले, त्यानंतर बातरुम मधील झाडू वरही रक्ताचे डाग दिसले. यावरून 16 वर्षाच्या मुलीची तिच्या आई वडील समोर चौकशी केली असता तिने ही कबुली दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेतील मुलगा आणि मुलगी हे एकाच वर्गात शिकत होते. मुलगी 16 तर मुलगा 17 वर्षांचा आहे. दहावीला असतानाच यांचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यातूनच शारीरिक संबंध आल्या नंतर मुलगी गरोदर राहिली होती. शिकण्याच्या वयातच वासनांध प्रेमसबंधात अडकलेल्या या पीडित मुलीवर पुढचे आयुष्य मात्र अंधकारामयच काडावे लागते की काय असेच चित्र सध्या तिच्या आयुष्यात निर्माण झाले आहे. या घटनेने प्रत्येक पालकांनी शाळेत जाणाऱ्या मुली, मुलं खरच शिक्षण शिकतात की अन्य मार्गाने जातात यावर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.