मुरूड तालुका कोरोना मुक्तीच्या मार्गावार! केवळ सहा रुग्ण पॉझिटिव्ह 

कोरोना मुक्त.jpeg
कोरोना मुक्त.jpeg
Updated on

मुरुड  ः कोरोना नियंत्रणात यावा यासाठी सरकारकडून विविध उपाय योजले आहेत. या उपायांचा प्रभावी अंमलबजावणी मुरूड तालुक्‍यांत करण्यात आल्याने तसेच जनतेने शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छ हात धुणे आदींचा चांगला वापर केल्यामुळे मुरूड तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्‍वास मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी व्यक्त केला आहे. 

जलवाहिनी फुटून जमलेल्या पाण्यात लीक झाला होता करंट, झटक्याने दोन BMC कर्मचारी दगावलेत
मुरूड तालुक्‍यात आत्तापर्यंत 431 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 23 जणांचा मुत्यू झाला आहे. सध्या 6 रुग्ण बाधित असून तेही थोड्या दिवसांत बरे होऊन आपल्या घरी जातील असे चित्र आहे. त्यामुळे काही दिवसांतच मुरूड तालुका कोरोनामुक्त होणार आहे.

अर्थातच याचे श्रेय सर्वप्रथम तालुक्‍यातील सर्व जनतेला जाते. त्याबरोबर आरोग्य यंत्रणेतील सर्व डॉक्‍टर्स, नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक-शिक्षिका यांनी जिवाची पर्वा न करता कोरोनामुक्तीसाठी परिश्रम घेत 
चांगले प्रबोधन केल्याचे गावित यांनी सांगितले. 
 नियमांचे पालन करा 
तालुका कोरोनामुक्त झाला तरी कोरोनाचा प्रार्दुभाव नव्याने होऊ नये त्याकरिता मास्कचा वापर, हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळायलाच हवी, तरच पूर्णता कोरोनामुक्त तालुका होईल. तरी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा, असे आवाहन तहसीलदार गमन गावित यांनी केले. 

Murud taluka will be free corona only six people positive

(संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.